शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

Elon Musk's SpaceX Inspiration 4 : 'स्पेसएक्स'ने रचला इतिहास, पहिल्यांदाच सामान्य नागरिक झेपावले अंतराळात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2021 09:07 IST

Elon Musk's SpaceX Inspiration 4 : कंपनीने या मोहिमेला 'इन्स्पिरेशन -4' असे नाव दिले आहे. या मोहिमेद्वारे अंतराळ पर्यटनास प्रोत्साहन मिळणार आहे. 

वॉशिंग्टन : एलन मस्क (Elon Musk) यांची अमेरिकन एयरोस्पेस कंपनी स्पेसएक्सने ( Space X)इतिहास रचला आहे. कंपनीकडून पहिल्यांदाच अंतराळवीर नाही तर सामान्य नागरिकांना अंतराळात पाठविण्यात आले आहेत. चार सामान्य नागरिकांना घेऊन जाणारे स्पेसएक्सचे पहिले यान बुधवारी रात्री अंतराळात रवाना झाले. कंपनीने या मोहिमेला 'इन्स्पिरेशन -4' असे नाव दिले आहे. या मोहिमेद्वारे अंतराळ पर्यटनास प्रोत्साहन मिळणार आहे. 

या चौघांनी ड्रॅगन कॅप्सूलमधून अवकाशात भरारी घेतली. हे प्रवासी तीन दिवस अवकाशात घालवतील, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनपासून 160 किमी उंच कक्षामधून जगाला प्रदक्षिणा घालतील. यानंतर हे यान पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश करेल आणि फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर उतरेल. दरम्यान, स्पेसएक्सचे संस्थापक एलन मस्क यांची अंतराळ पर्यटनाच्या जगात ही पहिलीच एंट्री आहे. यापूर्वी, ब्लू ओरिजिन आणि व्हर्जिन स्पेस शिपनेही खासगी अवकाश पर्यटन सुरू केले. 

'इन्स्पिरेशन -4' या मोहिमेचे नेतृत्व 38 वर्षीय इसॅकमॅन यांच्या हातात आहे. इसॅकमॅन हे पेमेंट कंपनीचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. वयाच्या १६व्या वर्षीच त्यांनी ही कंपनी सुरू केली होती. इसॅकमन यांच्या व्यतिरिक्त, हेली अर्केनो देखील या मोहिमेवर आहेत. 29 वर्षीय हेली यांनी कर्करोगावर मात केली आहे. त्या सेंट जुडे चिल्ड्रन्स रिसर्च हॉस्पिटलमध्ये फिजिशियन असिस्टंट आहेत. मोहिमेचे नेतृत्व करणाऱ्या इसॅकमॅन यांनी हॉस्पिटलला 100 मिलियन डॉलर्स देण्याचे वचन दिले आहे. त्यांना या मोहिमेद्वारे 100 मिलियन डॉलर जमा करायचे आहेत.

याचबरोबर, या मोहिमेत अमेरिकेच्या हवाई दलात वैमानिक राहिलेले ख्रिस सेम्ब्रोस्की आणि 51 वर्षीय शॉन प्रॉक्टर यांचा समावेश आहे. शॉन प्रॉक्टर हे एरिझोना येथील महाविद्यालयात भूशास्त्राचे प्राध्यापक आहेत. तर हेली अर्केनो या अवकाशात भरारी घेणाऱ्या सर्वात तरुण अमेरिकन नागरिक आहेत. नासाच्या फ्लोरिडा येथील केनडी स्पेस रिसर्च सेंटर येथून स्पेसएक्सचे यानाने चौघांना घेऊन अवकाशात भरारी घेतली. चार जण तीन दिवस जवळपास 575 किमी उंचीवर पृथ्वीच्या कक्षेत राहणार आहेत. 

टॅग्स :NASAनासा