शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

चीनने पिकवला पहिला ‘अंतराळ तांदूळ’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2021 13:15 IST

संशोधनासाठी होणार वापर. चंद्राच्या सफरीवरून आले बियाणे.

ठळक मुद्देसंशोधनासाठी होणार वापर.चंद्राच्या सफरीवरून आले बियाणे

अंतराळाची २३ दिवसांची वारी करून आलेल्या तांदळाच्या बियांपासून चीनने पहिले पीक घेतले असून, हा ‘अंतराळ तांदूळ’ आता पुढील संशोधनासाठी वापरण्यात येणार आहे.

नोव्हेंबर २०२० मध्ये चीनने आपल्या ‘चँगए-५’ चांद्रयानात ४० ग्रॅम तांदूळ अंतराळात चंद्राच्या सफरीसाठी पाठवला होता. २३ दिवस हे बियाणे अंतराळात शून्य गुरुत्वाकर्षणात होते. वैश्विक किरणोत्सर्गाच्याही ते संपर्कात आले होते. चीनच्या ग्वांगडाँग प्रांतातील दक्षिण चीन कृषी विद्यापीठातील संशोधन केंद्रात हे बियाणे पेरण्यात आले होते. त्याची आता सोंगणी व मळणी करण्यात आली आहे. यातून मिळालेला नवा तांदूळ १ सेंटिमीटर लांब असून, तीन मोठ्या पार्सलांत तो भरण्यात आला आहे.

‘ग्लोबल टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, यातील उत्तम दाणे प्रयोगशाळांत पैदाशीसाठी पाठविले जातील. त्यानंतरच्या टप्प्यात ते प्रत्यक्ष शेतात पेरले जातील. चीन १९८७ पासून अवकाशात बियाणे पाठवून संशोधन करीत आहे. कापूस आणि टोमॅटोच्या बियांवर अशा पद्धतीचे प्रयोग याआधी चीनने केले आहेत. चीनने २०० पेक्षा अधिक पिकांच्या ‘अंतराळ जातीं’ना उत्पादनासाठी मंजुरी दिलेली आहे. २०१८ मध्ये चीनमधील ‘अंतराळ पिकां’खालील क्षेत्र २.४ दशलक्ष हेक्टर होते.

तांदळाची नवीन जात विकसित होणे शक्य संशोधन केंद्राचे उपसंचालक गुआ ताओ यांनी सांगितले की, यातून तांदळाची नवी व अधिक उत्पादन देणारी जात विकसित होण्याची संशोधकांची अपेक्षा आहे. हा तांदूळ प्रत्यक्ष बाजारात यायला तीन ते चार वर्षे लागू शकतात. चीनच्या तांदूळ संशोधन क्षेत्रातील तज्ज्ञ शू ली यांनी ‘ग्लोबल टाइम्स’ला सांगितले की, या तांदळाच्या आणखी काही पिढ्यांची पेरण्या करून तपासणी केली जाईल. त्याचा तुलनात्मक अभ्यास केला जाईल. विभागीय तपासण्यांनंतर प्रादेशिक व राज्य पातळीवर तपासण्या होतील. 

टॅग्स :chinaचीनfoodअन्न