शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

डेटिंगसाठी युवक-युवतींना देणार २८ हजार, लग्नासाठी देणार ११ लाख ६० हजार रुपये, जन्मदर वाढवण्यासाठी या देशाने लढवली शक्कल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 06:18 IST

South Korea News: देशातील कमी होत असलेली लोकसंख्या ही अनेक देशांमधील मोठी समस्या आहे. जन्मदर कमी झाल्याने दक्षिण कोरियामध्ये चिंतेचे वातावरण आहे. जन्मदर वाढावा, देशाची लोकसंख्या वाढावी यासाठी सरकार विविध उपाययोजना करीत आहे.

सेऊल - देशातील कमी होत असलेली लोकसंख्या ही अनेक देशांमधील मोठी समस्या आहे. जन्मदर कमी झाल्याने दक्षिण कोरियामध्ये चिंतेचे वातावरण आहे. जन्मदर वाढावा, देशाची लोकसंख्या वाढावी यासाठी सरकार विविध उपाययोजना करीत आहे. आता जन्मदर वाढावा, लोकसंख्या वाढावी यासाठी सरकारने युवकांनाप्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. हे प्रोत्साहन केवळ शाब्दिक नसून त्यासाठी सरकार पैसे मोजणार आहे.

युवक-युवतींनी एकत्र यावे, डेटिंगवर जावे, विवाह करावा यासाठी सरकार आर्थिक मदत करणार आहे. यावरून तेथील सरकार किती गांभीर्याने ही पावले उचलत आहे याची कल्पना येते. सरकारने युवक-युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. तरुणांना डेटवर जाण्यासाठी सरकारने अनेक डेटिंग अॅप्सना सोयी-सवलती दिल्या आहेत. सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून आणि डेटिंग इव्हेंट्सचेही आयोजन केले जात आहे. 

डेटिंग इव्हेंंटचे आयोजनडेटिंगसाठी आयोजित इव्हेंटमध्ये युवक-युवती एकमेकांना भेटतात आणि ओळख वाढवतात. ते एकमेकांना पसंत करू लागले आणि डेटवर जायचे ठरवले तर त्याचा खर्च देखील रकार उचलते. सरकार डेटवर जाणाऱ्या जोडप्याला ३४० डॉलर (सुमारे २८ हजार रुपये) खर्च करण्यासाठी देते. जर जोडप्याने लग्न करण्याचा निर्णय घेतला तर सरकार त्यांना १४ हजार डॉलर (सुमारे ११ लाख ६० हजार रुपये) रक्कम बक्षीस म्हणून देते. लग्न केलेल्यांना घर खरेदीसाठी अनुदान दिले जाते. गर्भधारणेशी संबंधित खर्च आणि परदेश प्रवासासाठी देखील पैसे सरकारकडून दिले जातात.  

दोन वर्षात किती विवाह?सरकारने पुढाकार घेत अनेक जिल्ह्यांमध्ये विवाहांना प्रोत्साहनपर कार्यक्रम राबवले. या योजनांचा प्रचार केला. परंतु या योजनांना सुरुवात झाल्यापासून ऑगस्ट २०२२ ते ऑगस्ट २०२४ या कालखंडात देशभरात सुमारे ४२ जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारचे मॅचमेकिंग कार्यक्रम आयोजित करण्यात आले.परंतु यातून केवळ २४ जोडप्यांनी विवाह केले आहेत. त्यामुळे हे प्रोत्साहन नागरिकांच्या फारसे पचनी पडलेले दिसत नाही.सरकारकडून विवाहासाठी इतकी मोठी रक्कम देण्याची ऑफर दिली असताना जनमानसात याचा फारसा प्रभाव पडल्याचे दिसत नाही.

टॅग्स :South Koreaदक्षिण कोरियाrelationshipरिलेशनशिप