शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
2
स्कुबा डायव्हिंग करताना ५२ वर्षीय प्रसिद्ध गायकाचा मृत्यू, चाहत्यांना मोठा धक्का
3
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
4
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
5
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
6
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
7
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
8
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
9
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
10
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
11
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
12
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
13
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
14
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
15
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
16
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
17
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
18
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
19
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
20
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती

दक्षिण कोरियानंतर डोनल्ड ट्रम्प चीनमध्ये, उत्तर कोरियावर काय चर्चा करणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2017 13:56 IST

डोनल्ड ट्रम्प सध्या  आशिया-पॅसिफिक दौऱ्यावर आहेत. जपानमध्ये पंतप्रधान शिंजो अबे यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा केल्यानंतर ते दक्षिण कोरियाला गेले होते. त्यानंतर आता ते आज चीनमध्ये पोहोचले आहेत. चीनमध्ये कोणत्या महत्त्वाच्या विषयांचा चर्चेमध्ये समावेश करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

ठळक मुद्देसर्व जगाने विरोध आणि निषेध केला तरी उत्तर कोरियाने आपल्या अणूचाचण्या सुरुच ठेवल्या आहेत. सप्टेंबर महिन्यात केलेल्या अणू क्षेपणास्त्राच्या सहाव्या चाचणीनंतर हे अस्त्र जपानला पार करुन गेल्याचे व आता अमेरिका आमच्या टप्प्यात असल्याचा दावा उत्तर कोरियाने केला उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनी एकमेकांवर अनेकवेळा तीव्र टीका केली आहे.

बीजिंग-अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प सध्या  आशिया-पॅसिफिक दौऱ्यावर आहेत. जपानमध्ये पंतप्रधान शिंजो अबे यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा केल्यानंतर ते दक्षिण कोरियाला गेले होते. त्यानंतर आता ते आज चीनमध्ये पोहोचले आहेत. चीनमध्ये कोणत्या महत्त्वाच्या विषयांचा चर्चेमध्ये समावेश करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.उत्तर कोरियाचा अणू कार्यक्रम आणि तेथिल हुकूमशहा किम जोंग उन सर्वांच्या चिंतेचा मुद्दा बनला आहे. त्यामुळे उत्तर कोरियावर सर्वच देशांनी जास्तीत जास्त बंधने आणावित यासाठी अमेरिका प्रयत्नशील आहे. उत्तर कोरियाचे 90 %आर्थिक अस्तित्त्व चीनवर अवलंबून असल्यामुळे डोनल्ड ट्रम्प यांना कोरियाविरोधी शिष्टाई चीनमध्ये करावी लागणार आहे. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याबाबतीत ट्रम्प यांनी सकारात्मक भूमिका घेत त्यांची अध्यक्षपदी पुनर्निवड झाल्यावर त्यांचे अभिनंदनही केले होते.जपान आणि दक्षिण कोरियामध्ये उत्तम आदरातिथ्य अनुभवल्यानंतर ट्रम्प यांचे त्याहून चांगले आदरातिथ्य करण्यासाठी जिनपिंग सरसावले आहेत. ट्रम्प आणि जिनपिंग "फॉरबिडन सिटी"लाही भेट देणार आहेत. दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर असताना तेथिल संसदेला संबोधित करताना ट्रम्प यांनी उत्तर कोरियावर अत्यंत तीव्र शब्दांमध्ये टीका केली होती. उत्तर कोरियामध्ये अत्यंत निंदनीय शासन असल्याचा प्रहारच त्यांनी या भाषणामध्ये केला. तसेच उत्तर कोरिया हा एक पंथ असल्याप्रमाणे चालवला जात असल्याचीही टीका त्यांनी केली. सर्व जगाने विरोध आणि निषेध केला तरी उत्तर कोरियाने आपल्या अणूचाचण्या सुरुच ठेवल्या आहेत. सप्टेंबर महिन्यात केलेल्या अणू क्षेपणास्त्राच्या सहाव्या चाचणीनंतर हे अस्त्र जपानला पार करुन गेल्याचे व आता अमेरिका आमच्या टप्प्यात असल्याचा दावा उत्तर कोरियाने केला होता. उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनी एकमेकांवर अनेकवेळा तीव्र टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी जपान, दक्षिण कोरिया आणि चीन या उत्तर कोरियाच्या शेजारी देशांमध्ये दौरा करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. उत्तर कोरियाविरोधात वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न ते या दौऱ्याच्या पहिल्या दिवसापासून करत आहेत.

टॅग्स :USअमेरिका