शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

दक्षिण कोरियातील प्रसिद्ध अभिनेत्रीने केली आत्महत्या, सुसाइड नोट वाचून व्हाल इमोशनल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2022 13:01 IST

Yoo Joo Eun Suicide : दक्षिण कोरियातील न्यूज पोर्टल सोम्पीच्या रिपोर्टनुसार, यू जू-उन ने आपल्या सुसाइड नोटमध्ये लिहिलं की, ती आत्महत्या करण्याबाबत गेल्या काही दिवसांपासून विचार करत होती.

Yoo Joo Eun Suicide : दक्षिण कोरियातील (South Korea) अभिनेत्री यू जू-उनने सोमवारी आत्महत्या केली. ती 27 वर्षांची होती. तिच्या मृत्यूबाबत तिच्या परिवाराने माहिती दिली. त्यांनी हेही सांगितलं की, यू जू ने आपल्या आई-वडिलांच्या नावे एक सुसाइड नोटही लिहून ठेवली. यू जू ने अनेक लोकप्रिय शोजमध्ये काम केलं होतं. दक्षिण कोरियातील न्यूज पोर्टल सोम्पीच्या रिपोर्टनुसार, यू जू-उन ने आपल्या सुसाइड नोटमध्ये लिहिलं की, ती आत्महत्या करण्याबाबत गेल्या काही दिवसांपासून विचार करत होती.

2018 मध्ये 'बिग फॉरेस्ट' मधू डेब्यू करणाऱ्या यू जू-उन ने सुसाइड नोटच्या माध्यमातून आई, वडील आणि मोठ्या भावाची माफी मागितली आहे. तिने लिहिलं की, तिच्या मनाला धक्का बसला आहे आणि आता तिला जगायची इच्छा राहिलेली नाही. तिच्या परिवाराने तिची सुसाइड नोट सार्वजनिक केली आहे.

यू जू-उन ने आपल्या सुसाइड नोटमध्ये लिहिलं की, 'मला सर्वातआधी तुम्हा सर्वांना सोडून जाण्याचं दु:खं आहे. खासकरून मला आई, वडील, आजी आणि मोठ्या भावासाठी वाईट वाटत आहे. माझं मन मला सतत सांगतं की, मला जगायचं नाहीये. माझ्याशिवाय तुमचं जगणं अवघड होऊ शकतं. पण कृपया हिंमतीने जगा. मी प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवेन. रडू नका, तुम्ही दु:खी होऊ नका'.

'मी अजिबात उदास नाहीये. मला दृढ आणि शांत वाटत आहे. मला असं वाटतंय कारण मी या गोष्टीबाबत खूप आधीपासून विचार करत आहे. मी खूप सुखी जीवन जगले ज्याचा मला अधिकार होता. ते माझ्यासाठी पुरेसं आहे. त्यामुळे कुणावरही दोष न देता मी जात आहे'.

यू जू-उन ने तिच्या सुसाइड नोटमध्ये पुढे लिहिलं की, 'मी जगातून गेलेली नाही. त्यामुळे सगळे चांगले जगा. मला आशा आहे की, माझ्या अंत्यसंस्कारात बऱ्याच लोकांना बोलवलं जाईल. आणि प्रत्येकाला मला काही क्षणासाठी बघायचं आहे. एका अशा व्यक्तीला बघायचं आहे ज्याच्यासाठी हा काळ फार कठिण होता. देवाचं माझ्यावर प्रेम आहे. त्यामुळे तो मला नर्कात पाठवणार नाही. ते माझ्या भावना समजून घेतील आणि माझी काळजी घेतील. कुणीही चिंता करू नका'.

तिने लिहिलं की, 'माझ्यावर प्रेम करणाऱ्या परिवाराला, माझ्या मित्रांना आणि माझ्या फॅन्सचे धन्यवाद. हेच लोक माझी ताकत आणि माझं हास्य होते. मी एक यशस्वी जीवन जगले. मला समजून घेण्यासाठी आणि मला मिठी मारण्यासाठी धन्यवाद. मला दु:खं आहे की, हे मी चांगल्या प्रकारे व्यक्त करू शकत नाही. पण तुम्ही सगळे समजून घ्याल, हो ना?'.

टॅग्स :South Koreaदक्षिण कोरियाCelebrityसेलिब्रिटी