शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
एकीकडे मोदींना 'मित्र' म्हणायचं तर दुसरीकडे 'हे' पाऊल उचलायचं; ट्रम्पचा नेमका 'प्लॅन' काय?
3
Video - परिस्थिती भीषण! जे दिसलं, ते सर्वच लुटलं... नेपाळमध्ये Gen-Z आंदोलनकर्त्यांचा धुडगूस
4
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
5
iPhone 17: भारत, दुबई, अमेरिका की इतर कुठे; कोणत्या देशात आयफोन १७ मिळतोय स्वस्त? वाचा
6
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
7
सगळ्यात स्वस्त ७ सीटर असणाऱ्या 'या' कारची किंमत ९६ हजारांनी झाली कमी! आता कितीला मिळणार?
8
'मुंबईत घर घेणं आम्हाला परवडत नाही'; ८१ टक्के लोकांचं स्पष्ट मत, सर्वेक्षणात काय म्हटलंय? 
9
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
10
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
11
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
12
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
13
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
14
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
15
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
16
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
17
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
18
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
19
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
20
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न

Corona Virus : चिंताजनक! 'या' देशांत पसरला कोरोनाचा नवा व्हेरिएंट XBB; जाणून घ्या, कितपत धोकादायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2022 18:17 IST

Corona Virus : चीननंतर Omicron चा नवीन व्हेरिएंट XBB स्ट्रेन सिंगापूरमध्ये देखील आढळला आहे. तेव्हापासून एकच खळबळ उडाली आहे.

जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत असतानाच आता पुन्हा एकदा वाईट बातमी समोर येत आहे. चीननंतर Omicron चा नवीन व्हेरिएंट XBB स्ट्रेन सिंगापूरमध्ये देखील आढळला आहे. तेव्हापासून सिंगापूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे आशियामध्ये पुन्हा एकदा कोरोना प्रकरणांचं डुप्लिकेशन होण्याची भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. सध्या, बांगलादेश आणि सिंगापूर सारख्या देशांमध्ये XBB प्रकरणांमध्ये थोडीशी वाढ झाली आहे.

फॉर्च्यूनच्या रिपोर्टनुसार, सिंगापूरमध्ये गेल्या आठवड्यात दररोज सरासरी 5,500 प्रकरणे नोंदली गेली आहेत. तर महिन्याभरापूर्वी रोजची सरासरी दोन हजार प्रकरणे होती. सिंगापूरमधील अधिकार्‍यांना सध्या याची फारशी चिंता नाही. सोमवारी आरोग्य मंत्री ओंग ये कुंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील कोरोना प्रकरणांपैकी केवळ 15 टक्के रुग्णांना पुन्हा संसर्ग झाल्याचे दिसून आले आहे. जर पुन्हा संसर्ग 50 टक्क्यांच्या वर गेला तरच आपण असे मानू शकतो की ते कोरोनाची लाट आहे.

शेड्यूलच्या तीन दिवस अगोदर म्हणजेच मंगळवारी, आरोग्य मंत्रालयाने नवीन "XBB Omicron sub-variant" मुळे वाढत्या संक्रमणाचा हवाला देत Moderna चे Omicron बूस्टर लोकांसाठी उपलब्ध करून दिले. रुग्णांच्या वाढीबरोबरच सिंगापूरमध्ये रूग्णांच्या रुग्णालयात दाखल होण्याच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. परंतु मृत्यूच्या घटनांमध्ये घट कायम आहे.

बांगलादेशातही कोरोना प्रकरणांमध्ये थोडीशी वाढ झाली आहे. तथापि, नोंदवलेली संख्या सिंगापूरपेक्षा कमी आहे. दक्षिण आशियाई देशात 3 ऑक्टोबरच्या आठवड्यात सरासरी सुमारे 500 प्रकरणे नोंदवली गेली, तर एका महिन्यापूर्वी सरासरी 300 प्रकरणे होती. त्याच वेळी, बांगलादेशमध्ये लसीकरणाचे प्रमाण 75.5 टक्के आहे.

सोमवारी, हाँगकाँगच्या आरोग्य अधिकार्‍यांनी सांगितले की, त्यांना XBB.1 चं शहरातील पहिलं प्रकरण आढळलं, जो XBB स्ट्रेनचा एक उपप्रकार आहे. पेकिंग युनिव्हर्सिटी आणि चांगपिंग प्रयोगशाळेतील संशोधकांनी लिहिलेल्या 4 ऑक्टोबरच्या अभ्यासात असे आढळून आले की नवीन XBB प्रकारांमध्ये अँटीबॉडी संरक्षणास हानी पोहोचवण्याची मोठी क्षमता आहे. एक्सबीबी आणि BA.2.75.2 सारख्या नवीन प्रकारांविरूद्ध मोनोक्लोनल अँटीबॉडी उपचार कमी प्रभावी असू शकतात याची तज्ञांनाही चिंता आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉन