शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

भीषण! कोरोनानंतर आता पुरामुळे दक्षिण आफ्रिका उद्ध्वस्त; 400 लोकांचा मृत्यू, 40 हजार लोक बेघर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2022 15:57 IST

South Africa Flood : डरबन शहराच्या काही भागात पाणी शिरलं, त्यामुळे रस्ते पूर्णपणे वाहून गेले आहेत. या पुरात रुग्णालय-घरे उद्ध्वस्त झाली असून लोक या पाण्यात वाहून गेले आहेत. 

कोरोनानंतर आता पुरामुळे दक्षिण आफ्रिका उद्ध्वस्त झालं आहे. पुरामुळे मोठी जीवितहानी झाली आहे. देशातील सर्वात भीषण आपत्तीमध्ये आतापर्यंत 400 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर हजारो लोक बेघर झाले आहेत. दक्षिण-पूर्व किनारपट्टीवरील डरबन शहराच्या काही भागात पाणी शिरलं, त्यामुळे रस्ते पूर्णपणे वाहून गेले आहेत. या पुरात रुग्णालय-घरे उद्ध्वस्त झाली असून लोक या पाण्यात वाहून गेले आहेत. 

सरकारने शनिवारी माहिती देताना सांगितले की, या आपत्तीतील मृतांची संख्या 398 वर गेली आहे, तर 27 लोक बेपत्ता आहेत. 40 हजारांहून अधिक लोक बेघर झाल्याचंही सरकारने सांगितलं. सरकारच्या म्हणण्यानुसार, घरांमध्ये अडकलेल्या लोकांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. पोलिसांपासून लष्कर आणि स्वयंसेवकांपर्यंत शोध आणि बचाव कार्य वेगाने सुरू आहे. गंभीर परिस्थिती निर्माण झाली  आहे. 

बचाव पथकाच्या म्हणण्यानुसार, डरबन जिल्ह्यातील बेपत्ता कुटुंबातील 10 लोकांपैकी एकाचाही अद्याप शोध लागलेला नाही. डरबन इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसच्या प्रवक्त्याने सांगितले की, पहिल्या पुरानंतर 6 दिवसांनी, वाचलेल्यांचा शोध घेण्याची आशा आता फारच कमी आहे. त्यांनी सांगितले की, लोक त्यांच्या बेपत्ता नातेवाईकांना शोधण्यासाठी भटकत आहेत. 

परिस्थिती पाहता, सरकारने आपत्कालीन मदत निधीमध्ये एक अब्ज रँड ($68 मिलियन) जाहीर केले आहेत. याव्यतिरिक्त, आफ्रिकन फुटबॉल कॉन्फेडरेशनचे प्रमुख पॅट्रिस मोत्सेपे यांनी 30 दशलक्ष रँड ($2.0) जाहीर केले आहेत. मोटसेपे यांनी लोकांना संकटाचा सामना करावा लागत आहे. यातून बाहेर येण्यासाठी आम्ही सर्वतोपरी मदत करू असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :South Africaद. आफ्रिकाfloodपूरRainपाऊस