शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

काहीतरी मोठं घडणार...?; "आता अशी शस्त्रे काढू, जी तुम्ही कधी पाहिली नसतील...!", इराणच्या 'खूंखार' कमांडरची अमेरिकेला धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 21:30 IST

इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) चे मेजर जनरल इब्राहिम जबारी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना थेट धमकी दिली आहे...

मध्यपूर्वेत जबरदस्त युद्ध पेटले आहे. वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, इस्रायल आणि अमेरिकेने संयुक्तपणे इराणवर मोठा हल्ला केला. यानंतर इराणनेही पलटवार करत अमेरिकेच्या काही ठिकाणांवर आणि इस्रायलवर क्षेपणास्त्रे डागली. दरम्यान, इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) चे मेजर जनरल इब्राहिम जबारी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना थेट धमकी दिली आहे. त्यांनी अशा शस्त्रांनी हल्ला करण्यासंदर्भात भाष्य केले आहे, जे अद्याप जगालाही माहीत नाहीत.

"अशी शस्त्रे काढू, जी तुम्ही कधी पाहिली नसतील" -खरे तर, ही धमकी IRGC चे मेजर जनरल इब्राहिम जबारी यांनी दिली आहे. धमकी देताना ते म्हणाले, ट्रम्प यांना हे माहित असायला हवे की, आज आम्ही आमच्या जुन्या भांडारातील क्षेपणास्त्रे डागली. आणि आता लवकरच अशा शस्त्रांचे प्रदर्शन करून, जी अमेरिकेनं यापूर्वी कधीही बघितली नसतील.

दरम्यान अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणनेही इस्रायलवर अत्यंत भीषण प्रतिहल्ला केला. इराणने आतापर्यंत ७० हून अधिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे इस्रायलवर डागली. इस्रायली संरक्षण दलाने (IDF) या हल्ल्याची पुष्टीही केली. तसेच संपूर्ण देशात हाय-अलर्ट जारी केला. इस्रायलची येरुशलेम, हाइफा आणि शेफेल्लाह यांसारखी मोठी शहरे इराणच्या निशाण्यावर आहेत. येरुशलेममध्ये सायरनच्या आवाजासह नागरिकांना तातडीने 'बॉम्ब शेल्टर'मध्ये जाण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. 

हूती आणि हिजबुल्ला युद्धाच्या मैदानात - या युद्धाचे स्वरूप आता अधिक व्यापक होत चालले आहे. इराणच्या समर्थनार्थ येमेनमधून हूती बंडखोरांनी लाल समुद्रात आणि इस्रायलवर बॅलिस्टिक मिसाइल्स डागली आहेत. तसेच लेबनॉनमधून हिजबुल्लानेही हल्ले सुरू केले आहेत. 

अमेरिका इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या ५१ शाळकरी मुलींचा मृत्यू -इस्रायल-अमेरिकेने इराणमधील साधारण ३० विविध ठिकाणांना लक्ष्य करत भीषण हवाई हल्ले केले. या लष्करी कारवाईदरम्यान इराणमधील एका शाळेवर झालेल्या हल्ल्यात ५१ विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तसेच ६०हून अधिक मुली जखमी झाल्या आहेत. इराणच्या सरकारी माध्यमांनी याला दुजोरा दिला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Iran Threatens US with Unknown Weapons Amidst Escalating Middle East Conflict

Web Summary : Amidst rising tensions, Iran warns the US of unprecedented weapons after alleged Israeli-US attacks. Iran retaliated with missile strikes, while regional actors like Houthi rebels and Hezbollah join the conflict. Reports allege civilian casualties, including schoolgirls, from the strikes.
टॅग्स :IranइराणAmericaअमेरिकाIsraelइस्रायल