शहरं
Join us  
Trending Stories
1
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
2
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
3
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
4
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
5
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांचा 'चतुर' मारा; ऋतुराज गायकवाड एकटा भिडला अन् विराटला... 
6
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
7
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
8
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
9
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
10
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
11
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
12
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
13
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
14
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
15
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
18
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
19
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
20
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार

उत्तर कोरियाला एकटे पाडा, अमेरिकेचे जगाला आवाहन, युद्ध झाल्यास उद्ध्वस्त क रू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 1:47 AM

आंतरखंडीय स्फोटक क्षेपणास्त्राच्या चाचणीने उत्तर कोरियाने संपूर्ण जगापुढे गंभीर धोका निर्माण केल्याने सर्व देशांनी किम-जाँग-उन यांच्या राजवटीशी असलेले सर्व संबंध तोडून दबाव टाकावा,

वॉशिंग्टन/संयुक्तराष्ट्रे : आंतरखंडीय स्फोटक क्षेपणास्त्राच्या चाचणीने उत्तर कोरियाने संपूर्ण जगापुढे गंभीर धोका निर्माणकेल्याने सर्व देशांनी किम-जाँग-उन यांच्या राजवटीशी असलेले सर्वसंबंध तोडून दबाव टाकावा, असे आवाहन अमेरिकेने केले आहे. युद्ध झालेच तर उत्तर कोरिया पूर्णत: उद्ध्वस्त होईल, असा इशाराही अमेरिकेने दिला आहे.संयुक्त राष्टÑाच्या सुरक्षा परिषदेच्या तातडीने बोलाविण्यात आलेल्या बैठकीत अमेरिकेचे राजदूत निक्की हॅली यांनी सर्व देशांना उत्तर कोरियाला एकटे पाडण्याचे आवाहन केले. उत्तर कोरियाने केलेल्या क्षेपणास्त्र चाचणीनंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी संपर्क साधून उत्तर कोरियाचा कच्च्या तेलाचा पुरवठा बंद करण्याची गळ घातली. चीन हा उत्तर कोरियाचा एकमेव मोठा मित्र देश आणि व्यापारी भागीदार आहे.कच्च्या तेलाचा पुरवठा बंद केल्यास उत्तर कोरियाच्या अर्थव्यवस्थेला तडाखा बसेल. सुरक्षा परिषदेने उत्तर कोरियाचा संयुक्त राष्ट्रातील मतदानाचा हक्क काढून घ्यावा, असे आवाहनही हॅली यांनी केले. उत्तर कोरियाच्या कुरापतीने निर्माण झालेली स्थिती आणि उत्तर कोरियाला वठणीवर आणण्यासाठी काय पावले उचलणे जरुरी आहे, या मुद्द्यावर विचार करण्यासाठी सुरक्षा परिषदेची तातडीची बैठक बोलाविण्याची विनंती अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरियाने केली होती. (वृत्तसंस्था)...तर शिल्लक राहणार नाहीक्षेपणास्त्राची चाचणी घेऊन उत्तर कोरियाने युद्धाचा धोका वाढवला आहे. उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम-जाँग-उन यांच्या या दु:साहसामुळे जग युद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. युद्ध झालेच तर उत्तर कोरियाचा मागमूसही शिल्लक राहणार नाही. पूर्णत: उद्ध्वस्त होईल, असा सज्जड इशारा निक्की हॅली यांनी दिला.

टॅग्स :north koreaउत्तर कोरियाUSअमेरिका