शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुलीनेच फिल्मी स्टाईलने आपल्या आईच्या बॉयफ्रेंडची केली हत्या, जाणून घ्या कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 16:18 IST

आपल्या आईचा 21 वर्षीय बॉयफ्रेंड साकिब हुसैन आणि त्याच वयाच्या त्याच्या मित्राचा तिने अपघात घडवून आणला. ज्यात दोघांचाही मृत्यू झाला. तिने फेब्रुवारी 2022 मध्ये हे कृत्य केलं होतं. 

एका सोशल मीडिया स्टार मुलीला आपल्याच आईच्या सीक्रेट बॉयफ्रेंडच्या हत्येसाठी दोषी ठरवण्यात आलं आहे. तरूणीचं नाव महक बुखारी असून ती 24  वर्षांची आहे. आपल्या आईचा 21 वर्षीय बॉयफ्रेंड साकिब हुसैन आणि त्याच वयाच्या त्याच्या मित्राचा तिने अपघात घडवून आणला. ज्यात दोघांचाही मृत्यू झाला. तिने फेब्रुवारी 2022 मध्ये हे कृत्य केलं होतं. 

न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, हुसैनने कथितपणे महकची 46 वर्षीय आई अंसरीन बुखारीला ब्लॅकमेल केलं होतं की, तो तिचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करेल. जेणेकरून दोघांच्या नात्याबाबत सगळ्यांना कळेल. तेव्हा अंसरीनला हे नातं संपवायचं होतं.

याच आठवड्यात इंग्लंडच्या लीसेस्टर क्राऊन कोर्टमध्ये ज्यूरीने अंसरीनला सुद्धा दोषी ठरवलं होतं. अशात महकने आपल्या आईची मदत करण्याचा निर्णय घेतला. तिने व्हॉट्सअॅपवर मेसेज केला की, 'मी लवकरच काही लोकांना पकडवून देणार'.

महकने त्यानंतर प्लान केला. ती हुसैनला म्हणाली की, त्याने त्याच्या नात्याबाबत तोंड बंद ठेवावं आणि त्या बदल्यात 3 हजार डॉलर दिले जातील. जेव्हा हुसैन आपल्या मित्रासोबत पैसे घेण्यासाठी निघाला तेव्हा दोन गाड्या त्यांचा पाठलाग करत होत्या. त्याने पोलिसांना फोन केला आणि याबाबत सांगितलं. हुसैन म्हणाला की, त्याला मारण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याच्या किंचाळीनंतर फोन बंद झाला. कारचा अपघात झाला होता. ज्यात दोघांचाही मृत्यू झाला.

गाडी चालवणाऱ्या 29 वर्षीय रेखान कारवान आणि 23 वर्षीय रइस जमाल यांनाही हत्येसाठी दोषी ठरवण्यात आलं. सोबतच प्लानमध्ये सहभाही असल्याने 23 वर्षीय तनाशा अख्तर, 28  वर्षीय अमीर जमाल आणि 23 वर्षीय सनफ गुलामुस्तफा यांनाही दोषी ठरवण्यात आलं. हे लोक हुसैनचा पाठलाग करणाऱ्या कारमध्ये होते. यांना लवकरच शिक्षा सुनावली जाईल.

टॅग्स :LondonलंडनCrime Newsगुन्हेगारी