शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

...तर कच्चे तेल ३०० डॉलरने खरेदी करावे लागेल; पेट्रोल-डिझेल खरेदीवरून रशियाची थेट धमकी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 05:28 IST

जागतिक कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात रशियाचा वाटा ८ टक्के असून, युरोप ३०% पुरवठा करते. युरोपीय महासंघासह आम्ही रशियाचा कच्च्या तेलाचा पुरवठा थांबवू असे अमेरिकेने म्हटले आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती १४० डॉलर प्रतिबॅरलवर पोहोचल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : रशियाच्या तेल पुरवठ्यावर निर्बंध लादण्याच्या तयारीत असलेल्या अमेरिका आणि युरोपला रशियाने इशारा दिला आहे. जर अमेरिका आणि युरोपियन महासंघ आमच्यावर अशाप्रकारचे निर्बंध लादण्याचा विचार करत असेल तर कच्चे तेल ३०० डॅालरने खरेदी करण्यासाठी तयार रहा, अशी धमकी रशियाच्या एका मंत्र्याने दिली आहे.

रशियाकडून होणाऱ्या कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर निर्बंध लादल्यास पाश्चात्त्य देशांना कच्च्या तेलासाठी प्रतिबॅरल ३०० डॉलर मोजावे लागतील, असे रशियाचे उपपंतप्रधान अलेक्झांडर नोव्हाक यांनी म्हटले आहे. अशा कोणत्याही बंदीचा जागतिक बाजारावर मोठा परिणाम होईल. जागतिक कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात रशियाचा वाटा ८ टक्के असून, युरोप ३०% पुरवठा करते.युरोपीय महासंघासह आम्ही रशियाचा कच्च्या तेलाचा पुरवठा थांबवू असे अमेरिकेने म्हटले आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती १४० डॉलर प्रतिबॅरलवर पोहोचल्या आहेत.

...तर जर्मनीचा गॅस पुरवठा बंद करूरशियाच्या इंधन पुरवठ्यावर बंदी घालण्याचा विचारही करू नका, अन्यथा आम्ही जर्मनीला होणारा गॅस पाइपलाइनचा पुरवठा बंद करू, असा इशारा नोव्हाक यांनी युरोपीय देशांना दिला आहे. जर युरोपला आमच्याकडून तेल विकत घेणे थांबवायचे असेल तर ते भरून काढण्यासाठी एक वर्षापेक्षा जास्त वेळ लागेल. या काळात महाग तेल विकत घेण्याची तयारी ठेवावी तुम्हाला ठेवावी लागेल.

शहाणपणाने निर्णय घ्या : युरोपीय देशांनी स्वतःच्या हिताचा विचार करायला हवा, असे नोव्हाक म्हणाले. अशा परिस्थितीसाठी आम्ही आधीच तयार आहोत. आमच्या पुरवठ्यावर परिणाम झाला तर आम्ही इतर बाजारपेठेत पुरवठा सुरू करू. युरोप आपल्याकडील ४० टक्के गॅस खरेदी करतो. आमचा पुरवठा बंद झाल्याची भरपाई कशी करणार? याक्षणी आम्ही असे कोणतेही निर्बंध लादण्याचा विचार करत नाही; परंतु जर युरोप पुढे गेला तर आम्हालाही कठोर व्हावे लागेल, असे नोव्हाक यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाwarयुद्ध