शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

...तर अमेरिकेचा जर्मनीपेक्षा मोठी भरपाई चीनकडे मागण्याचा विचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2020 04:28 IST

प्रयोगशाळेत झालेल्या एका अपघातामुळे हा विषाणू हवेत मिसळला, असाही दावा काही देशांतील संशोधकांनी केला होता. चीनने मात्र, याचा स्पष्ट शब्दांत इन्कार केला आहे.

वॉशिंग्टन : चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूच्या साथीच्या प्रकरणाचा अमेरिका कसून तपास करत आहे. चीनकडे १३० अब्ज युरोची भरपाई मागण्याचा जर्मनीचा विचार आहे. त्यापेक्षाही अधिक रकमेच्या भरपाईची मागणी अमेरिका चीनकडे करू शकते, असा इशारा राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी दिला.हाईट हाऊसमध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेत ट्रम्प बोलत होते. चीनच्या हुबेई प्रांतातील वुहान शहरातून कोरोना विषाणूच्या साथीला सुरुवात झाली. आतापर्यंत जगभरातील ३० लाखांहून अधिक लोकांना ‘कोविड-१९’ या भयंकर रोगाची लागण झाली असून दोन लाखांहून अधिक लोक मरण पावले आहेत. या साथीने अमेरिकेपाठोपाठ युरोपमध्येही हाहाकार माजविला आहे.चीनने कोरोना साथीविषयी वेळीच सर्व जगाला सावध करायला हवे होते. त्यामुळे जगभर होत असलेली जीवित आणि वित्तहानी टाळता आली असती, असे अमेरिका, ब्रिटन, जर्मनीसह अनेक देशांचे मत आहे. कोरोना विषाणूमुळे झालेल्या भीषण नुकसानीची भरपाई चीनकडून वसूल करण्याचा विचार या देशांमध्ये बळावत आहे. चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेत जैविक युद्धासाठी या भयंकर विषाणूची निर्मिती करण्यात आली होती. मात्र प्रयोगशाळेत झालेल्या एका अपघातामुळे हा विषाणू हवेत मिसळला, असाही दावा काही देशांतील संशोधकांनी केला होता. चीनने मात्र, याचा स्पष्ट शब्दांत इन्कार केला आहे.>एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्नकोरोना विषाणूचा संसर्ग सुरू झाल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीनवर सातत्याने निशाणा साधत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने ‘कोविड-१९’ या महामारीच्या प्रकरणात चीनची बाजू घेतल्याचा आरोप करत ट्रम्प यांनी अमेरिकेकडून या संघटनेला देण्यात येणारा निधी रोखला आहे. अमेरिकेच्या या कृतीनंतर चीनने जागतिक आरोग्य संघटनेला काही प्रमाणात निधी दिला. चीनने या विषाणूबाबतची खरी माहिती जगापासून दडवून ठेवल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला होता. तो चीनला अमान्य आहे. एकंदरित, कोरोना साथीच्या मुद्द्यावरून चीन व अमेरिकेचे एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पchinaचीन