जकार्ता : इंडोनेशियाच्या सुलावेसी बेटाला शुक्रवारी (28 सप्टेंबर) जोरदार भूकंपाचा हादरा बसला. त्यानंतर जोरदार त्सुनामीही आली. या भूकंप आणि त्सुनामीत आतापर्यंत 1234 जणांचा मृत्यू झाला आहे. 7.5 रिश्टर स्केलचा भूकंपानंतर आलेल्या त्सुनामीनं इंडोनेशियाचं जनजीवन अक्षरशः कोलमडून गेलं आहे.नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत 1234 जणांचा मृत्यू ओढावला आहे. भूकंपामुळे पालू आणि डोंग्गाला या दोन शहरांचे अतोनात नुकसान झाले असून, बचावकार्य राबवले जात आहे, अशी माहिती एएफपी या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे. इंडोनेशियातील पालू भागाला या त्सुनामीचा जोरदार झटका बसला आहे. विशेष म्हणजे पालू भागाची लोकसंख्या तीन लाखांच्या आसपास आहे. त्सुनामीचा लाटा अजस्त्र असल्यानं इंडोनेशियातील समुद्रकिनारील भागातील वीजपुरवठा व मोबाईल टॉवर बंद पडली असून, इंडोनेशियाचं सरकार परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्नशील आहे.
Indonesia Tsunami: इंडोनेशियातल्या भूकंप आणि त्सुनामीमध्ये आतापर्यंत 1234 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 13:28 IST