शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

...तर ९० टक्के मुले जगणार नाहीत; गरीब देशांमध्ये कॅन्सरमुळे हाहाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2023 09:53 IST

गरीब देशांमध्ये कर्करोगाने ग्रस्त ०-२१ वर्षे वयोगटातील ४५ टक्के मुले योग्य उपचार न मिळाल्याने किंवा उपचारातील गुंतागुंतीमुळे मरण पावतात.

नवी दिल्ली : कर्करोगावर योग्य उपचार न मिळाल्याने गरीब देशांमध्ये दर १५ मुलांपैकी एकाचा मृत्यू होतो. लॅन्सेट ऑन्कोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनात ही बाब समोर आली आहे.

गरीब देशांमध्ये कर्करोगाने ग्रस्त ०-२१ वर्षे वयोगटातील ४५ टक्के मुले योग्य उपचार न मिळाल्याने किंवा उपचारातील गुंतागुंतीमुळे मरण पावतात. विकसित देशांमध्ये हा आकडा ३ ते ५ टक्के आहे. अहवालानुसार, कर्करोगाने ग्रस्त ९० टक्के मुले गरीब देशांमध्ये राहतात. येथे त्यांची जगण्याची शक्यता २० टक्क्यांपेक्षा कमी आहे.

कुपोषण एक कारण गरीब देशांमध्ये कुपोषणाचे प्रमाण खूप जास्त आहे. मुलांना पुरेसे अन्न मिळत नाही त्यामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत राहते. यामुळे शरीर कर्करोगाशी लढण्यास सक्षम नसते. यूएन अहवालानुसार २०२२ मध्ये ५ वर्षांखालील ४.५ कोटी मुले कुपोषणाला बळी पडले आहेत. 

जागतिक आरोग्य संघटना काय म्हणते?जगभरात दरवर्षी सुमारे एक कोटी लोक कर्करोगामुळे जीव गमावतात. धक्कादायक म्हणजे २०१० च्या तुलनेत २०१९ मध्ये कर्करोगामुळे सुमारे २१ टक्के अधिक मृत्यू झाले. २०१९ मध्ये कर्करोगाने एक कोटी लोकांचा मृत्यू झाला. सुमारे एक तृतीयांश कर्करोग तंबाखूच्या सेवनामुळे होतात. सिगारेट, गुटखा कोणत्याही स्वरूपातील तंबाखू आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. हल्ली सुमारे ८० टक्के फुप्फुसाचा कर्करोग धूम्रपानामुळे होतो.

टॅग्स :cancerकर्करोग