शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेत इम्रान खान यांची पुन्हा फजिती, सभेत झाली बलुचिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2019 11:12 IST

सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना वारंवार अपमानाचा सामना करावा लागत आहे.

वॉशिंग्टन - सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना वारंवार अपमानाचा सामना करावा लागत आहे. दौऱ्याच्या सुरुवातीला अमेरिकन सरकारने  साधी दखलही न घेतल्याने इम्रान खान यांना मेट्रोने प्रवास करावा लागला होता. ही घटना ताजी असतानाच रविवारी एका कार्यक्रमादरम्यान स्वतंत्र बलुचिस्तानच्या समर्थकांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे इम्रान खान यांना फजितीला सामोरे जावे लागले. रविवारी येथील एका ऑडिटोरियममध्ये आयोजित कार्यक्रमात इम्रान खान उपस्थितांना संबोधित करणार होते. दरम्यान, त्यांचे भाषण ऐकण्यासाठी अमेरिकेत राहणारे पाकिस्तानी लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचवेळी एका बलुचिस्तानी तरुणाने उभे राहून जोराजोरात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर इतरांकडूनही जोरदार घोषणाबाजी झाली. अखेरीस घोषणाबाजी करणाऱ्या तरुणांना सभागृहातून बाहेर काढण्यात आले. मात्र हा प्रकार सुरू असताना इम्रान खान यांनी आपले भाषण थांबवले नाही. अमेरिकेत राहणारे बलुचिस्तानी नागरिक पाकिस्तानकडून होत असलेल्या अत्याचाराविरोधात सातत्याने आवाज उठवत आहेत. बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानकडून सातत्याने मानवाधिकारांचे हनन होत असल्याचा आरोप बलुचिस्तानी नागरिकांकडून सातत्याने होत असतो. 

 दरम्यान, पंतप्रधान म्हणून पहिल्यांदाच अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलेल्या इम्रान खान यांच्या स्वागताला प्रशासनातील एकही मोठा नेता आला नव्हता. त्यामुळे सध्या ट्विटरवर खान यांची खिल्ली उडवली जात आहे. इम्रान खान कतार एअरवेजच्या विमानानं सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे अमेरिकेत पोहोचले होते. कतार एअरवेजच्या विमानातून अमेरिकेत दाखल झालेल्या इम्रान खान यांचा व्हिडीओ पीटीआयनं ट्विट केला आहे. यामध्ये खान एका सामान्य व्यक्तीसारखे विमानातून उतरताना दिसत आहेत. अनेकांनी यावरुन खान यांची खिल्ली उडवली.  

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानunited nationsसंयुक्त राष्ट्र संघ