सिंगापूरः फेक न्यूज(खोट्या बातम्या) आपल्याला चांगल्या पद्धतीनं माहीत आहे. अनेकदा फेक न्यूजचा वापर करून राजकीय नेत्यांसह सामान्यांची बदनामी केली जाते. अशा खोट्या बातम्यांचे अनेक प्रकार समोर आले आहेत. परंतु ते रोखण्यासाठी भारतात ठोस पावलं उचलली गेली नाहीत. पण सिंगापुरात ऑनलाइन पद्धतीनं पसरत असलेल्या खोट्या बातम्या रोखण्यासाठी नवा कायदा तयार करण्यात आलेला आहे. या कायद्यानुसार खोट्या बातम्या पसरवणं हा गुन्हा आहे.तसेच या कायद्यानुसार सरकारला अशा बातम्या पोर्टलवरून हटवण्याचा अधिकार देण्यात आला आहे. सिंगापुरात कोणी ऑनलाइन फेक न्यूज दिल्यास त्याला दोषी ठरवण्यात येणार आहे. त्याला 10 वर्षांचा तुरुंगवास आणि 3.77 कोटी रुपयांचा दंडही होऊ शकतो. सिंगापुरात विरोधी पक्ष असलेल्या वर्कर्स पार्टीचे खासदार डेनियल गोह यांनी ही माहिती फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिली आहे. या विधेयकाच्या बाजूनं 72 मतं पडली आहेत, तर विरोधात फक्त 9 मतं गेली आहेत.
फेक न्यूज रोखण्यासाठी बनवला कायदा, 10 वर्षांचा तुरुंगवास अन् 3.77 कोटींचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 16:35 IST