हनोई : भारत आणि व्हिएतनामने सोमवारी सात करारांवर स्वाक्ष:या केल्या. यामध्ये व्यूहात्मक तेल क्षेत्रतील सहकार्य वृद्धिंगत करण्याच्या कराराचा समावेश आहे. उभय देशांनी दक्षिण चीन समुद्रामध्ये मुक्त सागरी वाहतुकीचे आवाहनही केले. दक्षिण चीन सागराबाबत भारत, व्हिएतनामने केलेल्या आवाहनामुळे चीनच्या भुवया उंचावू शकतात, कारण चीन या समुद्रावर मालकीचा दावा करतो.
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या चारदिवसीय व्हिएतनाम दौ:याच्या दुस:या दिवशी उभय देशांनी करारांवर स्वाक्षरी केली. मुखर्जी यांनी त्यांचे व्हिएतनामी समपदस्थ त्रुओंग तान सांग यांच्याशी येथे चर्चा केली. (वृत्तसंस्था)