शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामासाठी अमेरिकेचे आभार मानायला हवेत का? एस. जयशंकर म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 12:07 IST

S. Jaishankar News: आम्ही दहशतवाद्यांचे अड्डे अचूकपणे उद्ध्वस्त केले. कोणत्याही नागरिकाचे नुकसान केले नाही. या काळात संघर्ष वाढेल, असे कोणतेही पाऊल उचलले गेले नाही, असे एस. जयशंकर यांनी म्हटले आहे.

S. Jaishankar News: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात अनेक कठोर पावले उचलली आहेत. तसेच या निर्णयांवर भारत ठाम असल्याचे पाहायला मिळत आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत भारत काय करू शकतो, याची एक चुणूक पाकिस्तानसह जगाला दाखवण्यात आली आहे. यानंतर आता भारतीय खासदारांचे शिष्टमंडळ जगभरातील अनेक देशांमध्ये जाऊन भारताची बाजू मांडत आहे. तसेच परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हेही अनेक देशांमध्ये जाऊन भारताची भूमिका मांडत आहेत. 

‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू असतानाच अचानक अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक्सवर पोस्ट केली. भारत आणि पाकिस्तानशी प्रदीर्घ चर्चेनंतर अखेरीस युद्धविरामासाठी तयार केले, असे सांगत श्रेय घेण्याचा प्रयत्न ट्रम्प यांनी केला. परंतु, काहीच दिवसांत आपल्या याच विधानावरून ट्रम्प यांनी घुमजाव केले. आपण मध्यस्थी नाही, तर मदत केली, असे म्हटले. परंतु, यावरून काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला एकामागून एक प्रश्न विचारायला सुरुवात केली. यातच एस. जयशंकरजर्मनी दौऱ्यावर असताना, भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामासाठी अमेरिकेचे आभार मानायला हवेत का, असा प्रश्न विचारण्यात आला. 

भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामासाठी अमेरिकेचे आभार मानायला हवेत का?

एका जर्मन पत्रकाराने एस. जयशंकर यांना विचारले की, भारत आणि पाकिस्तानमधील युद्धविरामाबाबत जगाने अमेरिकेचे आभार मानावे का? यावर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर म्हणाले की, युद्धविरामासाठी भारत आणि पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये थेट संपर्क झाला होता. त्यातच युद्धविरामावर सहमती झाली होती.  आम्ही पाकिस्तानचे मुख्य हवाई तळ आणि संरक्षण प्रणालींना प्रभावीपणे लक्ष्य केले होते. त्यामुळे युद्धविरामासाठी कोणाचे आभार मानावे? मला वाटते की, भारतीय सैन्य. कारण भारतीय सैन्याने केलेल्या कारवाईमुळेच पाकिस्तानला असे म्हणण्यास भाग पाडले की, आम्ही लढाई थांबवण्यास तयार आहोत.

दरम्यान, भारत-पाकिस्तान संघर्षादरम्यान जग अणुयुद्धापासून किती दूर होते? असाही प्रश्न एस. जयशंकर यांना विचारण्यात आला होता. यावर, खरे सांगायचे तर, मला या प्रश्नाचे आश्चर्य वाटते. आम्ही दहशतवाद्यांचे अड्डे अचूकपणे उद्ध्वस्त केले. कोणत्याही नागरिकाचे नुकसान केले नाही. या काळात संघर्ष वाढेल, असे कोणतेही पाऊल उचलले गेले नाही. यानंतर पाकिस्तानी सैन्याने आमच्यावर हल्ला केला. पण आम्ही त्यांना दाखवून दिले की, आम्ही काय करू शकतो. आम्ही त्यांची हवाई संरक्षण यंत्रणा नष्ट केली. त्यांच्या मागणीवरून गोळीबार थांबवण्यात आला. परंतु या काळात कधीही अणुहल्ल्याची चर्चा झाली नाही.

 

टॅग्स :operation all outऑपरेशन ऑल आऊटS. Jaishankarएस. जयशंकरIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानGermanyजर्मनी