शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

Joe Biden news: धक्कादायक Video! जो बायडेन विमानाच्या पायऱ्या चढताना तीनवेळा घसरले, पडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2021 08:06 IST

Joe Biden fall from Air Force one stairs: जो बायडेन हे अटलांटा दौऱ्यावर जाण्यासाठी निघाले होते. तिथे ते आशियाई- अमेरिकी नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे एअर फोर्स वन हे विमान जगातील सर्वात सुरक्षित आणि आलिशान समजले जाते.

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) हे त्यांच्या सर्वात सुरक्षित विमानाच्या पायऱ्या चढतेवेळी तीनवेळा घसरल्याचा प्रकार घडला आहे. त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. या घटनेचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. (President Joe Biden twice lost his footing while climbing up the steps to Air Force One.)

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे एअर फोर्स वन हे विमान जगातील सर्वात सुरक्षित आणि आलिशान समजले जाते. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारतात आलेले तेव्हा या विमानाची खासियत साऱ्यांना समजली होती. आता हे विमान अमेरिकेच्या नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन वापरतात. व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्याने सांगितले की, बायडेन यांचा पाय पायऱ्यांवरून घसरला, परंतू ते 100 टक्के बरे आहेत. 

बायडेन पायऱ्यांवरून घसरल्याचा व्हिडीओ वेगाने व्हाय़रल होत आहे. विमानात चढत असताना बायडेन हे घसरले होते. सावरून उठत असताना ते पुन्हा घसरले. त्यांना स्वत:ला सांभाळले आणि पुढे चालू लागले. तर दोन पायऱ्या होत नाही तोच तिसऱ्यांदा पाठीवर पडले. यानंतर उठून ते चालत वर गेले आणि मागे वळून सॅल्यूट केला. 

100 टक्के बरे...जो बायडेन हे अटलांटा दौऱ्यावर जाण्यासाठी निघाले होते. तिथे ते आशियाई- अमेरिकी नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत. व्हाईट हाऊसच्या स्पोक्सवुमन कैरीन जीन यांनी वॉशिंग्टनच्या जॉईंट बेस अँड्र्यूजमध्ये वेगवान वारे वाहत असल्याने ही घटना घडली. कैरीन यांनी सांगितले की, बाहेर खूप वेगाने हवा वाहत होती. यामुळे त्यांचा पाय घसरला असावा. 

अमेरिकेचे सर्वात वृद्ध राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे अमेरिकेचे सर्वात वृद्ध राष्ट्राध्यक्ष आहेत. गेल्य़ा वर्षीच्या सप्टेंबरमध्ये बायडेन यांच्या डाव्या पायाला हेअरलाईन फ्रॅक्चर झाले होते. ते त्यांच्या श्वानासोबत खेळत होते. 78 वर्षांच्या बायडेन यांनी 20 जानेवारीला राष्ट्राध्य़क्षपदाची शपथ घेतली होती. ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद सांभाळणारे सर्वात वृद्ध नेते आहेत. 

टॅग्स :Joe Bidenज्यो बायडनAmericaअमेरिका