शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली पत्नी इवाना ट्रम्प यांच्या मृत्यूबाबत समोर आली धक्कादायक माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2022 14:38 IST

Ivana Trump Death: अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या पत्नी इवाना ट्रम्प यांचा मृत्यू हा एका अपघातात गंभीर दुखापत झाल्याने झाला, अशी माहिती न्यूयॉर्कचे चीफ मेडिकल एक्झामिनर यांनी शुक्रवारी दिली. मात्र त्यांचा मृत्यू कोणत्या परिस्थितीत झाला, याबाबत त्यांनी माहिती दिलेली नाही.

वॉशिंग्टन - अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या पत्नी इवाना ट्रम्प यांचा अचानक मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान, इवाना ट्रम्प यांच्या मृत्युबाबतची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या पत्नी इवाना ट्रम्प यांचा मृत्यू हा एका अपघातात गंभीर दुखापत झाल्याने झाला, अशी माहिती न्यूयॉर्कचे चीफ मेडिकल एक्झामिनर यांनी शुक्रवारी दिली. मात्र त्यांचा मृत्यू कोणत्या परिस्थितीत झाला, याबाबत त्यांनी माहिती दिलेली नाही.

७२ वर्षीय इवाना ट्रम्प यांचा मृत्यू मॅनहॅटन येथील घरातील जिन्यावरून पडून झाला आहे का, याबाबत पोलीस तपास करत आहेत. न्यूयॉर्क पोलिसांच्या प्रवक्त्याने ईमेलद्वारे एएफपीला सांगितले की, घटनास्थळावर इवान ट्रम्प यांना मृतावस्थेमध्ये पाहिले गेले. त्यांच्या शरीरात कुठलीही हालचाल होत नव्हती. दरम्यान, त्यांच्या मृत्यूमागे कुठलाही घातपात दिसत नसल्याचे पोलिसांनी प्राथमिक तपासात म्हटले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी इवाना ट्र्म्प यांच्या मृत्यूची घोषणा केली होती. आमची तीन मुले ही इवानासाठी अभिमान आणि आनंदाचे कारण होते, असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. डोनाल्ड ट्रम्प आणि इवाना यांचा विवाह १९७७ मध्ये झाला होता. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह इवाना यांनी एकूण चार विवाह केले होते. त्यातील एक विवाह त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या विवाहापूर्वी आणि दोन डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी घटस्फोट झाल्यानंतर केले होते. ९० च्या दशकाच्या सुरुवातीला ते वेगळे झाले होते.

टॅग्स :United StatesअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प