शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

Video : धक्कादायक! चक्क 4 फुटांच्या अजगराला घातले खिशात, चोरी सीसीटीव्हीत कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 10:22 IST

अजगर पाहिल्यावर अनेकांची घाबरगुंडी उडते. मात्र एका व्यक्तीने चार फुटांचा अजगर चोरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे अजगर चोरल्यानंतर त्याने पँटच्या खिशात टाकला आणि गुपचूप निघून गेला.

ठळक मुद्देअजगर पाहिल्यावर अनेकांची घाबरगुंडी उडते. मात्र एका व्यक्तीने चार फुटांचा अजगर चोरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे अजगर चोरल्यानंतर त्याने पँटच्या खिशात टाकला आणि गुपचूप निघून गेला.अमेरिकेतील मिशिगनमध्ये असलेल्या एका Pet स्टोअरमधून अजगराची चोरी करण्यात आली आहे. चोराचा हा कारनामा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

अजगर पाहिल्यावर अनेकांची घाबरगुंडी उडते. मात्र एका व्यक्तीने चार फुटांचा अजगर चोरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे अजगर चोरल्यानंतर त्याने पँटच्या खिशात टाकला आणि गुपचूप निघून गेला. अमेरिकेतील मिशिगनमध्ये असलेल्या एका Pet स्टोअरमधून अजगराची चोरी करण्यात आली आहे. चोराचा हा कारनामा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. डेली मेलने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, 'आय लव्ह माय पेट्स स्टोर' या दुकानातून एका 4 फुटाचा अजगर चोरीला गेला आहे. चोराने या दुकानातून आधी 6 डॉलरचा एक उंदीर खरेदी केला. त्यानंतर त्याने अजगराची चोरी करून दुकानातून पळ काढला. चोरीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत असल्याची माहिती दुकानात काम करत असणाऱ्या एका कर्मचाऱ्याने दिली आहे. तसेच याबाबत फेसबुकवरही एक पोस्ट अपलोड करण्यात आली आहे. 

'आमच्या सर्वात सुंदर Ball Python ला कोणीतरी चोरलं आहे या गोष्टीवर विश्वास बसत नाही. 20 मार्च 2019 रोजी  एका व्यक्तीने हा सुंदर अजगर दत्तक घेतला होता. मात्र ज्या दिवशी आम्ही त्याला त्याचा घरी सोडणार होतो त्याच दिवशी अजगराची चोरी झाली आहे. जर तुमच्याकडे या अज्ञात व्यक्तीसंदर्भात काही माहिती असेल तर कृपया रॉकवूड पोलिसांकडे संपर्क करा' असं पेट स्टोअरमधील एका कर्मचाऱ्याने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे. चोराचा स्टोअरमधून अजगर चोरतानाचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. 

रॉकवूड  पोलिसांनी स्टोअरमधील सीसीटीव्ही फुटेज आपल्या फेसबुक पेजवरून शेअर केलं आहे. तसेच या अजगराचा शोध घेण्यासाठी मदत मागितली आहे. जवळपास चार फुटाचा साप चोराने पँटच्या खिशात टाकून चोरल्याची माहिती मिळताच सर्वजण हैराण झाले आहेत. तसेच या चोरीचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत असून आरोपीचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अजगराची चोरी झाल्याचं समजताच लोकांनी फेसबुक पोस्टमधून प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. चोरीला गेलेला अजगर लवकरता लवकर सुखरुप सापडावा अशी आशा अनेक लोक व्यक्त करत आहेत. तस्करीसाठी हा अजगर चोरण्यात आला असल्याची देखील सध्या प्राथमिक माहिती मिळत आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :Americaअमेरिका