शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम आशियामधून जहाज बेपत्ता, जहाजामधील कर्मचाऱ्यांमध्ये 22 भारतीय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2018 11:29 IST

पश्चिम आशियातील बेनिन किनाऱ्याजवळून एक व्यापारी जहाज बेपत्ता झाले आहे. या जहाजातील खलाशांमध्ये  सुमारे 22 भारतीयांचा समावेश आहे.

मुंबई -  पश्चिम आशियातील बेनिन किनाऱ्याजवळून एक व्यापारी जहाज बेपत्ता झाले आहे. या जहाजातील खलाशांमध्ये  सुमारे 22 भारतीयांचा समावेश आहे. एमटी मरिन एक्स्प्रेस असे या जहाजाचे नाव आहे.  पनामाचा ध्वज असलेले हे जहाज गुरुवारी बेपत्ता झाले असून, त्या जहाजाबाबत अद्याप कुठल्याही प्रकारची माहिती मिळालेली नाही. या मालवाहू जहाजामध्ये गॅस ऑइल भरलेले होते. या जहाजाचा शोध घेण्यासाठी जहाज मालकांनी मुंबईमध्ये जहाजवाहतूक महासंचालकांची मदत मागितली आहे. तसेच कंपनीने शोधमोहीम सुरू करण्यासाठी नायजेरिया आणि बेनिनशीसुद्धा संपर्क साधला आहे.  एमटी मरीन एक्स्प्रेस या जहाजाशी जहाज मालकांचा असलेला संपर्क 1 फेब्रुवारी रोजी तुटला होता. संपर्क तुटला तेव्हा हे जहाज बेनिनमधील कोटोनोऊ येथे होते. दरम्यान, शनिवारपर्यंत या जहाजाचा ठावठिकाणा लागला नव्हता. "आम्ही नायजेरियाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना या संदर्भात माहिती दिली असून, तेथील तटरक्षक दल या जहाजाचा तपास सुरू करणार आहे, अशी माहिती डायरेक्टर जनरल ऑफ शिपिंग, मुंबईचे अतिरिक्त प्रभारी बी. आर. शेखर यांनी यासंदर्भात बोलताना दिली. हे जहाज पश्चिम आशियातील समुद्रामधून बेपत्ता झाल्याने सदर जहाजाचे अपहरण झाल्याची भीती व्यक्त करण्याच येत आहे. यादरम्यान नायजेरियाच्या अधिकाऱ्यांनी या परिसरातून प्रवास करणाऱ्या सर्व जहाजांना सावधानतेचा इशारा दिला आहे. बेपत्ता जहाजामधील खलाशांमध्ये 22 भारतीयांचा समावेश असून, त्यांना अँग्ले ईस्टर्न शिप मॅनेजमेंट कंपनीने पाठवले होते. दरम्यान, सदर जहाजाचे मालक असलेल्या कंपनीने जहाज बेपत्ता झाल्याची माहिती शुक्रवारी ट्विटरवरून दिली होती. तसेच अँग्लो ईस्टर्न कंपनीने  आपल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना जहाज बेपत्ता झाले असून, जहाजामधील कर्मचाऱ्यांशी आपला संपर्क तुटल्याची कल्पना दिली आहे.   

टॅग्स :Kidnappingअपहरणnewsबातम्या