शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

जापानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2022 05:51 IST

आबे यांनी प्रचारसभेत भाषण सुरू करताच पाठीमागून यामागामी या हल्लेखोराने गोळ्या झाडल्या. 

टोकियो : जपानच्या अर्थव्यवस्थेला शून्यातून बाहेर काढणारे आणि भारतासाठी मित्रासारखे राहिलेले जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे  (६७ वर्षे) यांची तेत्सुया यामागामी (४२ वर्षे) या हल्लेखोराने शुक्रवारी सकाळी गोळ्या झाडून हत्या केली. विशेष म्हणजे, या देशात बंदूक बाळगण्यासंदर्भात अत्यंत कडक कायदा असून, तिथे गुन्ह्यांचे प्रमाण तोकडे आहे. अशा देशात ही घटना घडल्याने जपानसह संपूर्ण जग हादरले आहे. आबे यांच्या निधनाबद्दल भारताने ९ जुलै रोजी राष्ट्रीय दुखवटा पाळण्याचे ठरविले आहे.

तेत्सुया यामागामी या हल्लेखोराने आबे यांच्या पाठीमागून केलेल्या गोळीबारानंतर ते जागीच कोसळले. त्यांना तत्काळ काही उपचार देण्याचेही प्रयत्न झाले. त्यावेळी त्यांचा श्वासोच्छवास व हृदयक्रिया बंद पडली होती असे वैद्यकीय तज्ज्ञांना जाणवले. आबे यांना हेलिकॉप्टरद्वारे तातडीने नारा वैद्यकीय विद्यापीठाच्या रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आले. तिथे त्यांना मोठ्या प्रमाणावर रक्तपुरवठा करण्यात आला. 

आबे यांची हृदयक्रिया पुन्हा सुरू व्हावी म्हणून उपचार सुरू होते. नारा वैद्यकीय विद्यापीठाच्या रुग्णालया डॉक्टरांनी आबे यांचे प्राण वाचविण्यासाठी सहा तास शर्थीचे प्रयत्न केले; पण त्यात यश येऊ शकले नाही. उपचारादरम्यान आबे यांना हृदयविकाराचा झटकाही आला होता. 

कुठे घडली घटना वरिष्ठ सभागृह हाऊस ऑफ काउन्सिलर्ससाठी रविवारी निवडणुका आहेत. त्याकरिता आबे यांची नारा शहरात प्रचारसभा आयोजिण्यात आली होती. त्याचवेळी हा हल्ला झाला.

काय घडले ? आबे यांनी प्रचारसभेत भाषण सुरू करताच काही मिनिटांमध्ये पाठीमागून यामागामी या हल्लेखोराने गोळ्या झाडल्या. 

का केली हत्या ?  आबे यांच्या धोरणांवर नाराज असल्यामुळेच हल्लेखोराने त्यांची हत्या केल्याचे सांगण्यात आले.

हल्लेखोराने काय वापरले ? हल्लेखोर यामागामीने डबल बॅरेलची हँडमेड गन यासाठी वापरली होती. पोलिसांनी त्याला तत्काळ अटक केली असून गन जप्त केली आहे. त्याची कसून चौकशी सुरू आहे.

टॅग्स :Shinzo Abeशिन्जो आबेJapanजपानprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदी