शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
3
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
4
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
5
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
6
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
7
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
8
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
9
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
10
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
11
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
12
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
13
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
14
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
15
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
16
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
17
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
18
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
19
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
20
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
Daily Top 2Weekly Top 5

'शेख हसीना बांगलादेशात लोकांना गायब करत आहेत', युनूस सरकारचा आरोप, ३५०० हून अधिक जण बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 13:28 IST

बांगलादेशात ३५०० हून अधिक लोक बेपत्ता झाले आहेत. बांगलादेशातील अंतरिम सरकारने स्थापन केलेल्या चौकशी आयोगाने म्हटले आहे की, शेख हसीना यांच्या राजवटीत सर्वोच्च लष्करी आणि पोलिस अधिकाऱ्यांचा हात लोक बेपत्ता होण्यामागे आहे, याबाबत पुरावे सापडले आहेत.

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर मोहम्मद सरकाारने आरोप केले आहेत. बांगलादेशातील लोक बेपत्ता होण्यामागे  शेख हसीना यांचा हात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. बांगलादेशातील अंतरिम सरकारने स्थापन केलेल्या चौकशी आयोगाने म्हटले आहे की, बांगलादेशातील लोकांच्या बेपत्ता होण्यामागे माजी पंतप्रधान शेख हसीना आणि त्यांच्या राजवटीचे सर्वोच्च लष्करी आणि पोलीस अधिकारी असल्याचा पुरावा सापडला आहे.

"काँग्रेसनं मुस्लिमांना 'कोटा' देऊन आरक्षण कमकुवत केले, 'त्या' आश्वासनांवरही मोदी सरकार ठाम"; शाह यांचं मोठं विधान

बांगलादेशातील बेपत्ता होण्याच्या घटनांचा तपास करणाऱ्या पाच सदस्यीय आयोगाने काळजीवाहू पंतप्रधान मुहम्मद युनूस यांचे मुख्य सल्लागार यांना "सत्याचा खुलाचा करणे" नावाचा अंतरिम अहवाल सादर केला. आयोगाचा अंदाज आहे की देशभरात ३५०० हून अधिक घटना बेपत्ताच्या घटना समोर आल्या आहेत. 

अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याचा दावा

शेख हसीना यांचे संरक्षण सल्लागार मेजर जनरल तारिक अहमद सिद्दीकी, नॅशनल टेलिकम्युनिकेशन मॉनिटरिंग सेंटरचे माजी महासंचालक आणि मेजर जनरल झियाउल अहसानंद, वरिष्ठ पोलिस अधिकारी मोनिरुल इस्लाम आणि मोहम्मद हारुन-ओर-रशीद आणि इतर अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना बडतर्फ केल्याचे अहवालात म्हटले आहे. त्या घटनांमध्ये सहभागी असल्याचे आढळून आले.

दुसरीकडे, माजी लष्कर आणि पोलिस अधिकारी फरार असून, अवामी लीगचे सरकार सत्तेवर आल्यानंतर हसीना यांचे परदेशात पलायन झाल्याचे मानले जात आहे. 

आयोगाचे अध्यक्ष आणि सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती मैनुल इस्लाम चौधरी यांनी युनूस सरकार यांना सांगितले की, तपासादरम्यान त्यांना एक पद्धतशीर रचना सापडली जी बेपत्ता होण्याच्या घटनांकडे दुर्लक्ष करते.

चौधरी म्हणाले की, बेपत्ता करणाऱ्या व्यक्तींना पीडितांची माहिती नव्हती. पोलिसांची रॅपिड ॲक्शन बटालियन पीडितांना पकडणे, छळ करणे आणि ताब्यात घेणे यासाठी जबाबदार असल्याचे अहवालात म्हटले आहे.

आयोगाने दहशतवादविरोधी कायदा २००९ रद्द करण्याचा किंवा सर्वसमावेशक सुधारणा तसेच RAB रद्द करण्याचा प्रस्ताव दिला. आयोगाचे सदस्य सज्जाद हुसेन यांनी सांगितले की, त्यांनी सक्तीने बेपत्ता झाल्याच्या १,६७६ तक्रारी दाखल केल्या आहेत आणि त्यापैकी ७५८ ची चौकशी केली आहे. यापैकी २०० लोक कधीही परतले नाहीत तर जे परत आले त्यापैकी बहुतेकांना रेकॉर्डमध्ये अटक दाखवण्यात आले आहे.

टॅग्स :Bangladeshबांगलादेश