शहरं
Join us  
Trending Stories
1
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
4
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
5
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
6
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
7
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
8
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
9
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
10
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
11
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
12
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
13
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
14
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
15
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
16
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
17
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
18
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
19
दिल्ली ब्लास्ट : 'अल-फलाह'चा नेमका अर्थ काय? युनिव्हर्सिटीचा फाउंडर कोण? सुनावली गेलीये तीन वर्षांची शिक्षा!
20
दिल्ली स्फोट प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; उत्तर प्रदेशातील हापुडमधून डॉ. फारुक ताब्यात...
Daily Top 2Weekly Top 5

बांग्लादेशात राजकीय भूकंप! शेख हसीना यांना फाशीची शिक्षा ठोठावली जाणार? 17 नोव्हेंबरला निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 17:59 IST

Sheikh Hasina Bangladesh: शेख हसीना यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयातील खटल्याला सामोरे जाण्याची तयारी दर्शवली आहे.

Sheikh Hasina Bangladesh: शेख हसीना यांचे सरकार कोसळल्यानंतर बांग्लादेशात अंतरिम सरकार स्थापन झाले. मात्र, अद्याप देशातील परिस्थिती पूर्वपदावर आलेली नाही. अशातच, सरकारने पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांना मानवतेविरुद्ध गुन्ह्यांच्या आरोपांत फाशीची शिक्षा सुनावण्याची तयारी केली आहे. देशातील ‘आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने’ गुरुवारी घोषणा केली की, या प्रकरणाचा अंतिम निकाल 17 नोव्हेंबरला जाहीर केला जाणार आहे. 

आवामी लीगने दिला ढाका बंदची हाक

या घोषणेनंतर ढाकामध्ये तणावाचे वातावरण आहे. माजी पंतप्रधानांचा पक्ष असलेल्या आवामी लीगने ‘ढाका बंद’चे आवाहन केले आहे. न्यायाधिकरणात उपस्थित पत्रकारांच्या माहितीनुसार, तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने निकालासाठी तारीख ठरवली असून, ढाक्यात अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

या खटल्यात शेख हसीनांसह माजी गृहमंत्री असदुज्जमान खान कमाल आणि तत्कालीन पोलीस महानिरीक्षक चौधरी अब्दुल्ला अल-मामून यांच्यावरही आरोप आहेत. हसीना आणि कमाल, दोघांनाही ‘फरार आरोपी’ घोषित करण्यात आले आहे. मुख्य सरकारी वकील मोहम्मद ताजुल इस्लाम यांनी तिन्ही आरोपींना मृत्युदंड देण्याची मागणी केली आहे.

मात्र, माजी पोलीसप्रमुख मामून यांनी सुरुवातीला स्वतः उपस्थित राहून खटल्याचा सामना केला, परंतु नंतर सरकारी साक्षीदार बनले. 28 दिवस चाललेल्या सुनावणीत 54 साक्षीदारांनी साक्ष दिली. त्यांनी2024 च्या ‘विद्यार्थी आंदोलना’दरम्यान सरकारने केलेल्या दडपशाहीचा तपशील मांडला.

विद्यार्थी आंदोलनाने कोसळले हसीना सरकार

5 ऑगस्ट 2024 रोजी विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनानंतर हसीनांचे आवामी लीग सरकार सत्तेवरून पायउतार झाले होते. सरकारवर आंदोलकांची हत्या, हत्येचा प्रयत्न, छळ व अमानवीय कृत्ये यांसारखे आरोप ठेवण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर ढाक्यात सैन्य, अर्धसैनिक दल आणि दंगलनियंत्रक पोलिस तैनात आहेत. शहरात कर्फ्यूसदृश परिस्थिती असून रस्ते ओस पडले आहेत.

हे कंगारू कोर्ट; हसीनांचा मोठा आरोप

निकालाच्या काही दिवस आधीच शेख हसीनांनी मोठे विधान केले. त्यांनी न्यायाधिकरणाला कंगारू कोर्ट म्हटले आणि दावा केला की, हे न्यायालय त्यांच्या राजकीय शत्रूंच्या नियंत्रणाखाली आहे. मी आंतरराष्ट्रीय निरीक्षणाखाली, अगदी आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयात (ICC) सुद्धा खटल्याला सामोरे जाण्यास तयार आहे, असा दावा त्यांनी केला. तसेच,  जर सरकारचे माझ्यावरील आरोप इतके खात्रीशीर असतील, तर त्यांनी माझ्यावर ICC मध्ये खटला चालवावा. पण ते तसे करत नाहीत, कारण ICC हे निष्पक्ष न्यायालय आहे आणि तिथे मला नक्कीच निर्दोष ठरवले जाईल, असेही ते म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Political Earthquake in Bangladesh: Sheikh Hasina Faces Death Sentence?

Web Summary : Following government collapse, Sheikh Hasina faces charges of crimes against humanity. A tribunal will deliver its verdict on November 17. Tensions rise in Dhaka; Hasina's party calls for a strike, alleging political motives. Hasina declares the court a Kangaroo court.
टॅग्स :BangladeshबांगलादेशCourtन्यायालयInternationalआंतरराष्ट्रीय