रफाह : ७ ऑक्टोबर २०२३ रोजी सुरू झालेले इस्रायल-हमास युद्धाची धग वाढत असून, इस्त्रायलने रफाह वगळता संपूर्ण गाझा ताब्यात घेतले आहे. दरम्यान, पॅलेस्टिनी महिलांच्या अंतर्वस्त्रांसह इस्रायली सैनिकांची काही छायाचित्रे व्हायरल होत आहेत. यासंबंधीचे काही व्हिडीओही समोर आले आहेत. यावर टीका झाल्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू असून, सैनिकांवर कारवाई केली जात असल्याचे इस्रायलने म्हटले.व्हिडीओमध्ये गाझामधील एका घरात एक इस्रायली सैनिक खुर्चीवर बसून हसताना दिसत आहे. त्याच्या एका हातात बंदूक आणि दुसऱ्या हातात महिलेची अंतर्वस्त्रे आहेत. युद्धाच्या सुरुवातीपासूनच पॅलेस्टिनी नागरिकांवर इस्रायल अत्याचार करत असल्याचा आरोप होत आहे.
इस्रायली सैनिकांची गाझात लाजिरवाणी कृत्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2024 07:03 IST