शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

घर सांभाळताना येताहेत नाकी नऊ, तिथे काश्मीर काय सांभाळणार, आफ्रिदीचा पाकिस्तानला घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 15:54 IST

काश्मीर आमचेच म्हणून गळे काढणाऱ्या आणि दहशतवादी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानला माजी अष्टपैलू क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने घरचा आहेर दिला आहे.

नवी दिल्ली - काश्मीर आमचेच म्हणून गळे काढणाऱ्या आणि दहशतवादी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानला माजी अष्टपैलू क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने घरचा आहेर दिला आहे. आपल्या लोकांना सांभाळताना पाकिस्तानच्या नाकीनऊ येत आहेत, तिथे काश्मीर काय सांभाळणार, असा प्रश्न उपस्थित करत आफ्रिदीने पाकिस्तानमध्ये नव्या वादाला तोंड फोडले आहे. तसेच काश्मीर भारतालाही न देता त्याला स्वतंत्र देश म्हणून मान्यता द्यावी,अशी मागणी करत आफ्रिदीने अकलेचे तारे तोडले आहेत.    एका पत्रकार परिषदेदरम्यान, आफ्रिदीने हे विधान केले असून, त्याच्या या वक्तव्याचा व्हिडीओ  सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पाकिस्तानमधील जनतेला सांभाळताना पाकिस्तानी सरकारच्या नाकी नऊ येत आहेत. तिथे हे काश्मीरला काय सांभाळणार? असे आफ्रिदीने म्हटले आहे. काश्मीर प्रश्नावर वारंवार आपले मत मांडणाऱ्या आफ्रिदीने यावेळी केलेले वक्तव्य पाकिस्तानसाठी अडचणीचे ठरू शकते. काश्मीर हा काही प्रश्न नाही. मी म्हणतो, ''पाकिस्तानला काश्मीर नको, भारतालाही काश्मीर देऊ नका, काश्मीरला वेगळ्या देशाचा दर्जा द्या.  म्हणजे कमीत कमी तेथील माणुसकी तरी जिवंत राहील. जी माणसं मरताहेत ती तरी मरणार नाहीत ना.'' आफ्रिदीने काश्मीरबाबत वक्तव्य करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीसुद्धा आफ्रीदीने आपल्या वक्तव्यातून भारतावर टीका केली होती. यावर्षी एप्रिल महिन्यात भारतीय लष्कराने ठार मारलेल्या 13 दहशतवाद्यांबाबत आफ्रिदीने सहानुभूती व्यक्त केली होती. त्यानंतर भारताचा क्रिकेटपटू गौतम गंभीर, राजकीय नेते आणि मान्यवरांनी आफ्रिदीच्या वक्तव्याचा समाचार घेतला होता. 

टॅग्स :Shahid Afridiशाहिद अफ्रिदीPakistanपाकिस्तानIndiaभारतJammu Kashmirजम्मू-काश्मीर