शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
2
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
3
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
4
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
6
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
7
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
8
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
9
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
10
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
11
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
12
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
13
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
14
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
15
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
16
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
17
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
18
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
19
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
20
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या

'काश्मीर आजचा दिवस कधीही विसरू शकत नाही', पाक पंतप्रधानांनी पुन्हा गरळ ओकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 20:08 IST

Shahbaz Sharif On Kashmir: 'आम्ही काश्मिरींना राजकीय आणि राजनैतिकदृष्ट्या पाठिंबा देत राहू, असे शरीफ म्हणाले.'

Shehbaz Sharif On Kashmir:पाकिस्तान वेळोवेळी भारतावर गरळ ओकत असतो. आता पुन्हा एकदा पाकिस्तानी पंतप्रधानांनी भारताविरोधात गरळ ओकली आहे. आज(5 जानेवारी 2025) पाकिस्तानात पाकिस्तानमध्ये काश्मीरमधील लोकांसाठी आत्मनिर्णय दिन साजरा करण्यात आला. यावेळी पाक पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारतावर अनेक आरोप करत पुन्हा एकदा सार्वमताचा मुद्दा उपस्थित केला. पाकिस्तान नेहमीच जम्मू-काश्मीरमधील लोकांच्या आत्मनिर्णय हक्काच्या बाजूने राहिला आहे. भविष्यातही आम्ही काश्मिरींना राजकीय आणि राजनैतिकदृष्ट्या पाठिंबा देत राहू, असे शरीफ म्हणाले.

संयुक्त राष्ट्रांच्या ठरावाचा उल्लेख शाहबाज शरीफ पुढे म्हणतात, आजच्याच दिवशी 1949 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी (यूएन) जम्मू-काश्मीरमध्ये मुक्त आणि निष्पक्ष सार्वमताची हमी देणारा ऐतिहासिक ठराव स्वीकारला होता. शाहबाज यांनी यावर जोर दिला की, आत्मनिर्णयाचा अधिकार हे UN चार्टरचे मुख्य तत्व आहे आणि संयुक्त राष्ट्र महासभा (UNGA) दरवर्षी आत्मनिर्णयाच्या कायदेशीर हक्काचे समर्थन करण्यासाठी ठराव पास करते. काश्मीरमधील लोकांना सात दशकांपासून हा अधिकार वापरता आलेला नाही हे दुर्दैव आहे.

पाक पंतप्रधानांचे आंतरराष्ट्रीय समुदायाला आवाहनपाक पंतप्रधान म्हणाले, आता वेळ आली आहे की, संयुक्त राष्ट्रांसह आंतरराष्ट्रीय समुदायाने आपल्या आश्वासनांचे पालन केले पाहिजे आणि अशी पावले उचलली पाहिजेत, जेणेकरून जम्मू आणि काश्मीरमधील लोकांना त्यांच्या आत्मनिर्णयाच्या अधिकाराचा वापर करता येईल. त्यांनी जागतिक समुदायाला मानवाधिकारांचे उल्लंघन ताबडतोब थांबवावे, राजकीय कैद्यांची सुटका करावी आणि काश्मिरी लोकांचे मूलभूत अधिकार आणि स्वातंत्र्य बहाल करावे, असे आवाहन केले.

कलम 370 चा उल्लेख जम्मू आणि काश्मीरवरील आपली पकड मजबूत करण्यासाठी भारत अनेक कठोर पावले उचलत आहे. याची सुरुवात भारत सरकारने 5 ऑगस्ट 2019 रोजी कलम 370 रद्द केल्यापासून झाली, अशी प्रतिक्रिया शाहबाज शरीफ यांनी दिली. तसेच, पाकिस्तानच्या सरकारी रेडिओनुसार, पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनीही त्यांचा देश काश्मिरी जनतेला राजकीय, राजनैतिक आणि नैतिक पाठिंबा देत राहील याचा पुनरुच्चार केला.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतJammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370