शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

श्रीलंकेतील सात राजकीय पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागितली मदत, 'हे' आहे कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2022 18:30 IST

श्रीलंकेतील 7 तामिळ पक्षांनी नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. या पत्रात श्रीलंकन ​​तमिळ लोकांच्या हक्कांबाबत चर्चा करण्यात आली आहे. भारत सरकारने श्रीलंका सरकारला घटनेतील 13वी दुरुस्ती लागू करण्याची विनंती करावी, असे म्हटले आहे.

श्रीलंकेतील सात राजकीय पक्षांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदतीचे आवाहन केले आहे. देशाच्या उत्तर आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये श्रीलंकन ​​तमिळांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पक्षांनी नरेंद्र मोदींना संयुक्त पत्र लिहिले आहे. पत्रात श्रीलंकेच्या राज्यघटनेतील 13व्या घटनादुरुस्तीच्या तरतुदींची पूर्ण अंमलबजावणी करण्यासाठी नरेंद्र मोदींची मदत मागितली आहे.

जुलै 1987 च्या भारत-श्रीलंका करारामुळे 13A म्हणजेच श्रीलंकेच्या राज्यघटनेची 13वी दुरुस्ती अस्तित्वात आली. या दुरुस्तीनुसार प्रांतीय परिषदांची स्थापना करण्यात आली. परंतु आतापर्यंत ही दुरुस्ती लागू करण्यात आलेली नाही, त्यामुळे श्रीलंकेतील तमिळांना सत्तेत त्यांचे योग्य स्थान मिळालेले नाही. 

पत्राचा मसुदा 29 डिसेंबर 2021 रोजी अंतिम करण्यात आला. 6 जानेवारी 2022 रोजी सर्व पक्षांनी त्यास मान्यता दिली. पंतप्रधानांना पत्र लिहिणाऱ्या राजकीय पक्षांमध्ये TNA, ITAK, TELO, PLOTE, EPRLF, TMP आणि TNP यांचा समावेश आहे. पत्रात श्रीलंकेतील तमिळ भाषिक लोकांना भेडसावणाऱ्या प्रमुख समस्यांचा उल्लेख आहे. हे पत्र कोलंबो येथील भारतीय उच्चायुक्त कार्यालयातून पंतप्रधान मोदींना पाठवले जाईल.

पत्रात काय लिहिले आहे?

नरेंद्र मोदींना लिहिलेल्या एका दीर्घ पत्रात राजकीय पक्षांच्या वतीने असे लिहिले आहे की, 1948 मध्ये ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर श्रीलंकेतील तमिळ भाषिक लोकांनी सर्व सरकारांकडून सत्तेचे योग्य वितरण करण्याची मागणी केली आहे. यासाठी अनेक प्रयत्न झाले पण तरीही हा प्रश्न सुटलेला नाही. भारत सरकार गेल्या 40 वर्षांपासून या प्रयत्नात सक्रियपणे गुंतले आहे.

न्याय्य आणि चिरस्थायी उपाय शोधण्याच्या भारताच्या दृढ वचनबद्धतेबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. ही वचनबद्धता तमिळ भाषिक लोकांच्या सन्मान, शांतता, सुरक्षा आणि स्वाभिमानाने जगण्याच्या न्याय्य आकांक्षा मजबूत करेल. आमच्या मागण्या मान्य करणाऱ्या फेडरल रचनेवर आधारित राजकीय समाधानासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. श्रीलंकेच्या उत्तर आणि पूर्वेला तमिळ भाषिक लोक नेहमीच बहुसंख्य राहिले आहेत.

सरकारी आश्वासनांचाही उल्लेख 

राजकीय पक्षांनी पीएम मोदींना उद्देशून त्यांच्या पत्रात श्रीलंकेच्या सरकारच्या आश्वासनांचाही उल्लेख केला आहे. पत्रात असे लिहिले आहे की 2009 मध्ये एलटीटीई सोबतच्या लढाईनंतर तत्कालीन राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपक्षे यांनी संयुक्त राष्ट्रसंघाचे तत्कालीन सरचिटणीस बान की मून यांच्यासमवेत एक संयुक्त विज्ञप्ति जारी केली होती, ज्यात राष्ट्रपती 13 व्या घटनादुरुस्तीची अंमलबजावणी करण्याच्या दिशेने काम करत असल्याचे नमूद केले होते. श्रीलंकेचा विकास आणि शांतता यासाठी तमिळ पक्षांसह सर्व पक्षांशीही चर्चा सुरू केली जाणार आहे. जून 2010 मध्ये, भारताचे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी श्रीलंकेबाबत एक विधान केले होते, ज्यामध्ये त्यांनी 13 वी घटनादुरुस्ती लागू करण्याचा आग्रह धरला होता.

टॅग्स :Sri Lankaश्रीलंकाNarendra Modi Stadiumनरेंद्र मोदी स्टेडियम