शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

१२६ कोटी नागरिकांची महिला भागवताहेत तहान; जलसंकटाचा सर्वाधिक फटका महिलांना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 09:14 IST

राजस्थान, पंजाब, बिहार, मध्य प्रदेश ही देशातील अशी राज्ये आहेत, जिथे महिलांना मुलगी जन्माला येऊ नये असे वाटते.

जिनिव्हा - जगभरातील तब्बल १२६ कोटी लोक पाण्यासाठी महिलांवर अवलंबून असल्याचे धक्कादायक वास्तव जागतिक आरोग्य संघटना-युनिसेफच्या अहवालातून समोर आले आहे. अहवालानुसार, आजही जगभरात १८० कोटी लोक अशा घरांमध्ये राहतात जिथे पाण्याची व्यवस्था नाही. अशा घरांमध्ये १५ आणि त्याहून अधिक वयाच्या मुलींवर प्रामुख्याने पाणी आणण्याची जबाबदारी असते.अशा पहिल्याच अभ्यासानुसार, जगभरातील पाणीपुरवठा होत नसलेली १० पैकी सात कुटुंबे पाणी आणण्याची जबाबदारी महिलांवर ढकलतात. केवळ ३० टक्के कुटुंबातील पुरुष पाणी आणण्यासाठी मदत करतात. अहवालानुसार, जगात जसजसे जलसंकट वाढत जाईल, तसतसा त्याचा सर्वाधिक फटका महिलांना बसणार आहे.

भारतात काय स्थिती? भारतातील २६ टक्के घरांमध्ये अजूनही पाणीपुरवठा होत नाही आणि २० टक्के घरांमध्ये महिलांना पाणी आणावे लागते.या कामात तिची दररोज सुमारे २० मिनिटे वाया जातात. देशातील सर्वाधिक पाणी आणण्याची जबाबदारी राजस्थानच्या महिलांवर आहे. महिलांना घरात योग्य तो सन्मानही दिला जात नाही. त्यांना अशा नोकऱ्या दिल्या जातात ज्यामुळे त्यांच्या आयुष्यात पुढील चांगल्या संधींची शक्यता कमी होते.

कोणत्या राज्यात मुलगी नकोशी?राजस्थान, पंजाब, बिहार, मध्य प्रदेश ही देशातील अशी राज्ये आहेत, जिथे महिलांना मुलगी जन्माला येऊ नये असे वाटते. या राज्यांतील पुरुषांमध्ये मात्र घरात मुलगी जन्माला यावी अशी इच्छा अधिक असते.

लैंगिक शोषणाची वाढती भीती१५ वर्षांखालील मुलींना पाणी आणण्यासाठी पाठवले जाते. त्यामुळे त्या शिक्षण, रोजगाराच्या संधींपासून वंचित राहतात. त्यांना दुखापत होण्याची आणि लैंगिक शोषणाची शक्यताही वाढते.

टॅग्स :Waterपाणी