शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिका-चीनमध्ये कटकारस्थानांचा सिलसिला; वुहानची प्रयोगशाळा कायमच चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2020 06:27 IST

कोरोनाचा विषाणू लॅबमध्ये तयार केल्याचा दावा तर फेसबुक आणि ट्विटरच्या पुढे जाऊन रशियातील सरकारी टेलिव्हिजन चॅनलच्या प्राइम टाइममध्ये जाऊन पोहचला होता.

न्यूयॉर्क : कोरोनाचा प्रसार नेमका झाला कोठून यावर मतमतांतरे असले तरी यानिमित्ताने पुन्हा एकदा अमेरिका आणि चीन यांच्यातील शाब्दिक संघर्ष जगासमोर येत आहे. आरोप प्रत्यारोप आणि कटकारस्थानांचा हा सिलसिला सुरूच आहे. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात अशा अफवा होत्या की, कोरोना हा चीनचा गोपनीय जैविक शस्त्र कार्यक्रम आहे. आधार नसलेला एक असाही दावा करण्यात येत होता की, कॅनडा आणि चीनच्या गुप्तचरांच्या एका टीमने वुहानमध्ये हा विषाणु पसरविला होता. कोरोनाचा विषाणू लॅबमध्ये तयार केल्याचा दावा तर फेसबुक आणि ट्विटरच्या पुढे जाऊन रशियातील सरकारी टेलिव्हिजन चॅनलच्या प्राइम टाइममध्ये जाऊन पोहचला होता. ही साथ पसरून तीन- चार महिने झाले तरी कारस्थानांच्या या कहाण्या थांबण्याचे नाव घेत नाहीत.चीनच्या विदेश मंत्रालयाच्या एका प्रवक्त्यांनी शाओ लिजियान यांनी वेळोवेळी पुराव्याविना सांगितले आहे की, कोरोनाची सुरुवात अमेरिकेतून झाली असावी. १२ मार्च रोजी त्यांनी ट्विट केले की, अमेरिकी सैन्य कोरोना विषाणू घेऊन वुहानमध्ये आले असावे. चीनच्या ग्लोबल टाइम्सनेही शाओ लिजियान यांच्या सुरात सूर मिसळला होता. शाओ लिजियान यांनी जो लेख टष्ट्वीट करत ही माहिती दिली तो लॅरी रोमानॉफ यांचा आहे. लॅरी हे ग्लोबल रिसर्चसाठी नियमित लेखन करतात. लॅरी यांनी आपल्या एका जुन्या लेखाचे निष्कर्षच पुन्हा मांडले होते की, या विषाणूंची उत्पत्ती चीनमध्ये झाली नाही. विशेष म्हणजे लॅरी यांच्या लेखात अमेरिकेवर टीका तर चीनचे समर्थन असते.अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प हे सातत्याने चीनकडे बोट दाखवित आलेले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेचा निधी रोखण्याबाबतही ट्रम्प यापूर्वीच बोलले आहेत. अमेरिकेचे नेते आणि काही विश्लेषक मात्र कोरोनासाठी चीनला जबाबदार ठरवित आहेत. फॉक्स न्यूजच्या प्राइम टाइममध्येही याचा उल्लेख करण्यात आला की, वुहानच्या प्रयोगशाळेतून कोरोनाचा प्रसार झाला.>न्यूझीलंडने मिळविले नियंत्रणन्यूझीलंड सरकारने दावा केला आहे की, देशात कम्युनिटी ट्रान्समिशनचा समाप्त झाले आहे. प्रभावीपणे या विषाणूला रोखले आहे. गत काही दिवसांत न्यूझीलंडमध्ये एक आकडी रुग्ण समोर येत आहेत. आतापर्यंत रुग्णांची संख्या दीड हजारच्या घरात आहे. तर, १८ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात सामाजिक निर्बंध कमी करण्यात आले आहेत. तरीही लोकांना घरातच थांबण्यास सांगण्यात आले आहे. पंतप्रधान अर्डर्न यांनी सांगितले की, आम्ही अर्थव्यवस्था पुन्हा सुरू करत आहोत. देशात सुरुवातीला काही रुग्ण आढळून येताच लॉकडाऊन सुरू करण्यात आले त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आहे.

 

टॅग्स :Americaअमेरिकाchinaचीनcorona virusकोरोना वायरस बातम्या