शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

ट्रम्प असभ्यतेची कोणतीच पायरी सोडत नाहीत; जावेद अख्तर यांची टीका

By जयदीप दाभोळकर | Updated: January 9, 2021 13:27 IST

बुधवारचा दिवस अमेरिकेच्या इतिहासातील ठरला होता काळा दिवस, ट्र्म्प समर्थकांनी संसद इमारतीत केला होता हिंसाचार

ठळक मुद्देबुधवारी ट्रम्प समर्थकांची पराभवाच्या पार्श्वभूमीवर संसंद इमारतीत केला होता हिंसाचारजगभरातील अनेकांनी केला घटनेचा निषेध

जगातील सगळ्यात जुनी लोकशाही असा लौकिक असलेल्या अमेरिकी लोकशाहीसाठी बुधवारचा दिवस सर्वांत काळाकुट्ट ठरला. डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन यांच्याकडे आता अमेरिकेची सूत्रं जाणार, हे स्पष्ट होताच शेकडो ट्रम्प समर्थकांनी थेट अमेरिकी संसदेवरच हल्ला चढवला. कॅपिटॉल हिल परिसरातील संसद इमारतीत घुसून ट्रम्प समर्थकांनी कामकाज बंद पाडण्याचा प्रयत्न केला. या वेळी झालेल्या हिंसाचारात चार जण ठार तर अनेक जण जखमी झाले. आंदोलकांनी चार तास संसद वेठीस धरली होती. यानंतर ट्रम्प यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होऊ लागली आहे. भारतानं देखील या घटनेचा निषेध केला होता. दरम्यान भारतीय गीतकार जावेद अख्तर यांनीदेखील ट्रम्प यांच्यावर जोरदार टीका केली आहे. "डोनाल्ड ट्रम्प हे असभ्यतेची कोणतीही पायरी सोडत नाहीत हे खरं आहे. ते किती खुज्या मनोवृत्तीचे आहेत हे ते आपल्या प्रत्येक कृतीतून दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्याला हे स्वीकारलं पाहिजे आणि त्यांना यासाठी १०० पैकी १०० गुण दिले पाहिजे," असं जावेद अख्तर म्हणाले. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर संताप व्यक्त केला. तसंच त्यांनी अमेरिकेच्या संसंदेत झालेल्या हिंसाचाराचा निषेधही केला. 

नेमकं काय झालं होतं ?अमेरिकी संसदेत बुधवारी मतदारवृंदाच्या मतांची मोजणी सुरू होती. या घटनात्मक प्रक्रियेत बायडेन यांच्या विजयाची औपचारिकता बाकी होती. मात्र, मतमोजणी प्रक्रिया सुरू असताना ट्रम्पसमर्थकांनी संसद परिसरात गोळा होण्यास सुरुवात केली. वाढलेल्या गर्दीने एका क्षणी संसदेभोवतालचे सुरक्षा कडे तोडत संसदेच्या इमारतीत घुसण्याचा प्रयत्न केला. या तणावाच्या वातावरणात पोलीस बंदोबस्तही तोकडा पडला.ट्रम्प यांचे आधी समर्थन नंतर आवाहन संसद परिसरात जसजशी आपल्या समर्थकांची गर्दी होऊ लागली तसतसा मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात उत्साह संचारला. त्यांनी अधिक संख्येने लोकांनी यावं, असं आवाहन केलं. मात्र, समर्थकांनी हिंसाचार करण्यास सुरुवात करताच ट्रम्प यांनी ‘या निवडणुकीत निश्चितच घोटाळा झाला आहे. परंतु तुम्ही त्यांच्या हातचे बाहुले होऊ नका. शांतता राखा आणि घरी जा,’ असं आवाहन समर्थकांना केलं.

टॅग्स :AmericaअमेरिकाUSअमेरिकाUS Riotsअमेरिका-हिंसाचारJaved Akhtarजावेद अख्तरDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पIndiaभारत