शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Myanmar: म्यानमारमध्ये रक्तरंजित रविवार; चिनी कंपनीला जाळल्याने आंदोलकांवर लष्कराचा गोळीबार, 51 ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 11:16 IST

Myanmar riots: म्यानमारमध्ये फेब्रुवारीमध्ये सत्ता उलथवण्यात आली होती. म्यानमारच्या लष्कराने देशावर ताबा घेतला होता तसेच लोकांनी निवडून दिलेल्या सरकारला बेदखल केले होते. आंग सान सू यांच्यासह मोठ्या नेत्यांना तुरुंगात डांबले आहे. यानंतर लोकांमध्ये सैन्याविरोधात उद्रेक पहायला मिळाला.

म्यानमारमध्ये लष्कराने सत्ता (Myanmar Army) हस्तगत केल्यानंतर परिस्थिती चिघळली आहे. रविवारी यंगून भागात आंदोलकांनी एका चीनच्या फॅक्टरीला आग (china Factory) लावली. यानंतर म्यानमारच्या लष्कराने आंदोलकांवर बेछुट गोळीबार केला. यामध्ये 51 आंदोलकांचा जागीच मृत्यू झाला आहे. गेल्या सहा आठवड्यांपासून आंदोलन सुरु आहे. (Security forces killed at least 22 anti-coup protesters in the poor, industrial Hlaingthaya suburb of Myanmar's main city on Sunday after Chinese-financed factories were set ablaze there, an advocacy group said.)

यंगूनच्या गोळीबारात 51 जणांचा मृत्यू झाला असून वेगवेगळ्या शहरांमध्ये रविवारी 12 लोक ठार झाले आहेत. एका संघटनेनुसार म्यानमारमध्ये आतापर्यंत 125 हून अधिक आंदोलक मारले गेले आहेत. या गोळीबारातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता काही जाणकारांनी वर्तविली आहे. काही ठिकाणे अशी आहेत, जिथे मृतदेह पडून आहेत. तिकडे लक्षही दिले गेले नाहीय. 

म्यानमारमध्ये सुरु असलेल्या या रक्तरंजित खेळामुळे जगाला चिंतेत टाकले आहे. रविवारच्या घटनेनंतर ब्रिटिश सरकारने चिंता व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे संयुक्त राष्ट्रांकडूनही म्यानमारच्या लष्कराने लोकांनी निवडून दिलेल्यांच्या हाती पुन्हा सत्ता सोपवावी असे आवाहन केले आहे. म्यानमारमध्ये फेब्रुवारीमध्ये सत्ता उलथवण्यात आली होती. म्यानमारच्या लष्कराने देशावर ताबा घेतला होता तसेच लोकांनी निवडून दिलेल्या सरकारला बेदखल केले होते. आंग सान सू यांच्यासह मोठ्या नेत्यांना तुरुंगात डांबले आहे. यानंतर लोकांमध्ये सैन्याविरोधात उद्रेक पहायला मिळाला. लोक रस्त्यावर उतरले असून आंग सान सू यांना सोडण्याची मागणी करत आहेत. 

गेल्या काही दिवसांपासून सैन्याने आक्रमक रुप घेत आंदोलन चिरडण्यासाठी आंदोलकांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर विरोधात पोस्ट टाकल्यासदेखील कारवाई केली जात आहे. आतापर्यंत तिथे 2156 लोकांना अटक करण्यात आली आहे. 

टॅग्स :Myanmarम्यानमारFiringगोळीबारchinaचीन