शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

अलर्ट! थंडीच्या दिवसांत अमेरिकेसह अनेक देशांत धुमाकूळ घालू शकतो कोरोना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2020 13:57 IST

सीडीसीचे संचालक रॉबर्ट रेडफील्ड यांनी वॉशिंग्टन पोस्टला एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी, याणेरे थंडीचे दिवस हे जगासाठी विनाशकारी ठरू शकतात, असे म्हटले आहे.

ठळक मुद्देकोरोनाची दुसरी लाट असेल अधिक घातकथंडीच्या दिवसांत कोरोना व्हायरस आतापेक्षाही अधिक प्रभावी आणि घातक रूप धारण करू शकतोसर्वात धोकादायक म्हणजे, थंडीच्या दिवसांत फ्लू आणि कोरोना व्हायरस एकाचवेळी होऊ शकतात

वॉशिंग्टन : कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. यातच, येणारे थंडीचे दिवस अमेरिकेसह अनेक देशांसाठी परीक्षेचे ठरू शकतात. या दिवसांत कोरोना व्हायरस आतापेक्षाही अधिक प्रभावी आणि घातक रूप धारण करू शकतो. त्यामुळे, या काळात कोरोनावर लगाम घालणे अधिक कठीन जाऊ शकते, असा इशारा अमेरिकेच्या सेंट्रल फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने (सीडीसी) दिला आहे.

सीडीसीचे संचालक रॉबर्ट रेडफील्ड यांनी वॉशिंग्टन पोस्टला एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी, याणेरे थंडीचे दिवस हे जगासाठी विनाशकारी ठरू शकतात. कार हे दिवसही फ्लूसाठी अनुकूल असतात. विशेष म्हणजे दोघांची लक्षणेही सारखीच असल्याने त्यांची ओळख होणे अधिक कठीन जाईल. तसेच या काळात अमेरिकेची स्थिती अधिक  विध्वंसक होऊ शकते. सर्वात धोकादायक म्हणजे, फ्लू महामारी आणि कोरोना व्हायरस महामारी एकाचवेळीही होऊ शकते.

कोरोनाची दुसरी लाट असेल अधिक घातक -  कोरोना व्हायरसची पहिली लहर अमेरिकेत आली तेव्हा अमेरिकेतील फ्ल्यूचा सिझन जवळजवळ संपलेला होता, हे अमेरिकेचे नशीब आहे. खरेतर, कोरोनावर व्हॅक्सीन नसल्याने थंडीच्या दिवसांत अधिक कठीन परिस्थिती निर्माण होईल. या दिवसांत फ्लू आणि कोरोनाचे रुग्ण अचानक वाढतील. यामुळे हेल्थ केयर सिस्टिमवर किती ताण येईल हे सांगणे अवघड आहे, असे सीडीआयचे संचालक रॉबर्ट यांनी म्हटले आहे.

रॉबर्ट म्हणले, यासाठी आपल्याला आतापासूनच तयारी करायला हवी. यासंदर्भात प्रत्येक शहरात आणि प्रत्येक गल्लीत, सूचना द्यावी लागेल आणि गाइडलाईन तयार करावी लागेल. व्हाइट हाऊसमधील कोरोना टास्क फोर्समधील डॉक्टर डेबोरा ब्रिक्स यांनीही, कोरोनाची दुसरी लाट येण्याची लक्षणे आतापासूनच दिसत असल्याचे म्हटले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता अशा टेस्ट किट तयार करण्यावर काम सुरू आहे. ज्या एकाच वेळी फ्ल्यू आणि कोरोना या दोन्ही आजारांचे निदान करू शकतील. 

आमेरिकेतील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता आठ लाखांवर पोहचला असून मृत्यूचा आकडा 44 हजारवर गेला आहे. येथे गेल्या 24 तासांत 2,700 हून अधिक लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिकाUSअमेरिकाUnited Statesअमेरिकाmedicineऔषधं