शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

समुद्रातून किंचाळण्याचा आवाज, बेपत्ता पाणबुडीतील अब्जाधिशांकडे काही तासांचाच ऑक्सिजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2023 07:49 IST

टायटॅनिकचे अवशेष दाखविण्यासाठी निघालेली ही पाणबुडी रविवारी बेपत्ता झाली होती

न्यूयॉर्क : जगातील सर्वात लोकप्रिय जहाज टायटॅनिकचे अवशेष दाखवण्यासाठी अटलांटिक महासागरात गेलेली पाणबुडी अजूनही बेपत्ता आहे. कॅनडाच्या पी-३ विमानाने शोधमोहीम ज्या भागात चालविली जात आहे तेथे पाण्याखाली लोकांचा किंचाळण्याचा आवाज समोर आला आहे. या प्रकारानंतर त्या भागात अतिरिक्त सोनार यंत्र तैनात करण्यात आले. पाणबुडी शोधण्यात गुंतलेल्या सरकारी यंत्रणांचा दावा आहे की पाणबुडीतील ऑक्सिजन गुरुवारी संपणार आहे. यामुळे पाणबुडीत असलेल्या अब्जाधीशांच्या नातेवाइकांची काळजी वाढली आहे.

टायटॅनिकचे अवशेष दाखविण्यासाठी निघालेली ही पाणबुडी रविवारी बेपत्ता झाली होती. तेव्हापासून या पाणबुडीचा शोध घेण्यात येत आहे. या पाणबुडीत पाकिस्तानी अब्जाधीश प्रिन्स दाऊद, त्याचा मुलगा सुलेमान, ब्रिटिश उद्योगपती हमिश हार्डिंग यांच्यासह पाचजण आहेत. ही पाणबुडी चालवणारी कंपनी ओशनगेटचे सीईओ स्टॉकटन रश आणि फ्रेंच संशोधक पॉल आनरी नार्जेलेट हेदेखील या पाणबुडीत आहेत.

शंभर वर्षं उलटून गेली, तरी टायटॅनिकचे अवशेष समुद्र तळाशी  आहेत. आपल्या पहिल्याच प्रवासात हिमनगाला धडकून बुडालेले हे त्या काळातलं सर्वांत मोठं जहाज होते.

शोधमोहिमेत आंतरराष्ट्रीय संस्थापाणबुडी शोधण्यात आंतरराष्ट्रीय संस्थाही सहभागी झाल्या आहेत. अमेरिकेच्या कोस्ट गार्डच्या प्रवक्त्याने म्हटले आहे की, बचाव कार्य अत्यंत गुंतागुंतीचे आहे आणि जर पाणबुडीचे स्थान माहीत असेल तर त्याला वाचवण्यासाठी आम्ही ताकदीने शक्य तितके प्रयत्न करू. 

१०,००० चौरस किमीमध्ये शोधटायटॅनिकचे अवशेष कॅनडाच्या न्यूफाउंडलँडच्या सेंट जॉन्सपासून दक्षिणेस ७०० किमी अंतरावर आहे. अमेरिकेच्या बोस्टनमधून ही बचाव आणि शोधमोहीम सुरू आहे. कोस्ट गार्डने सांगितले की, १० हजार चौरस किलोमीटरचा शोध घेतला आहे. या शोधमोहिमेत रोबोचाही वापर करण्यात येत आहे.

त्याने शंका व्यक्त केली अन् नोकरी गेली२०१८ मध्ये या उद्योगातील तज्ज्ञांनी ओशनगेट कंपनीच्या टायटन पाणबुडीबद्दल चिंता व्यक्त केली होती आणि कंपनीच्या सीईओला पत्र लिहिले होते. ज्या तज्ज्ञाने २०१८ पाणबुडी सुरक्षिततेच्या समस्यांबाबत चिंता व्यक्त केली होती त्याला ओशनगेटने काढून टाकले होते.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीय