शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

वैज्ञानिकांना बर्फात मिळाला 48,500 वर्षांपूर्वीचा खतरनाक व्हायरस! जाणून घ्या, किती आहे धोकादायक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2022 12:48 IST

यासंदर्भात बोलताना वैज्ञानिकांनी म्हटले आहे, की त्यांना दोन डझनहून अधिक व्हायरस मिळाले आहेत. यांपैक एक एका तलावाखाली जमा झालेला होता. तो जवळपास 48,500 वर्षांहूनही अधिक जुना आहे. 

हवामान बदलामुळे प्राचीन पर्माफ्रॉस्ट वितळणे मानवासाठी  एक नवा धोका निर्माण करू शकतो. यासंदर्भात बोलताना वैज्ञानिकांनी म्हटले आहे, की त्यांना दोन डझनहून अधिक व्हायरस मिळाले आहेत. यांपैक एक एका तलावाखाली जमा झालेला होता. तो जवळपास 48,500 वर्षांहूनही अधिक जुना आहे. 

युरोपातील वैज्ञानिकांना रशियाच्या सयबेरिया भागातील पर्माफ्रॉस्ट मधून काही सॅम्पल्स मिळाले आहेत. याचे त्यांनी परीक्षण केले. वैज्ञानिकांनी १३ नव्या पॅथोजेनना जिवंत केले आहे आणि त्यांचे विशेषत्व सांगितले आहे. यांना झॉम्बी व्हायरस असे नाव देण्यात आले आहे. यासंदर्भात बोलताना संशोधकांनी म्हटले आहे, की ते हजारो वर्ष बर्फात राहूनही संक्रमक आहेत.

काय म्हणाले वैज्ञानिक - वातावरणातील तापमानवाढीमुळे पर्माफ्रॉस्ट वितळल्याने मिथेनसारखे ग्रीनहाऊस वायू बाहेर पडतील आणि पर्यावरण आणखी खराब होईल. मात्र, सुप्त पॅथोजेन्सवर याच्या परिणामांसंदर्भातील अद्याप फारशी माहिती नाही, असा इशाराही वैज्ञानिकांनी या पूर्वीच दिला आहे. 

यासंदर्भात बोलताना रशिया, जर्मनी आणि फ्रान्सच्या वैज्ञानिकांनी म्हटले आहे की, त्यांनी शोधलेल्या व्हायरसना पुन्हा जिवंत करण्याचा जैविक धोका पूर्णपणे शून्य होती. कारण त्यांनी अशा स्ट्रेनना टार्गेट केले होते, जे अमीबा मायक्रोब्सनाच संक्रमित करू शकतील. मात्र, यातील एक व्हायरस हा जनावरे अथवा मानवाला संक्रमित करू शकतो, हे अत्यंत धोक्याचे आहे. याच वेळी त्यांनी इशारा देत म्हटले आहे, की त्यांचे काम वेगळे केले जाऊ शकते.

वैज्ञानिकांनी प्रीप्रिंट रिपॉझिटरी बायोरेक्सिव्हवर पोस्ट करण्यात आलेल्या एका आर्टिकलमध्ये लिहिले आहे, की 'प्राचीन पर्माफ्रॉस्ट वितळल्यानंतर या व्हायरसला रिलीज करू शकतो. अद्याप या लेखाचे पुनरावलोकन करण्यात आलेले नाही. बाहेरील वातावरणात आल्यानंतर, एक व्हायरस किती वेळ इन्फेक्शन पसरवू शकतो? हे कसे रोखले जाऊ शकते आणि आणि एक व्यक्ती किती वेळा संक्रमित होऊ शकतो, याचा अंदाज लावने अशक्य आहे. 

टॅग्स :scienceविज्ञानInternationalआंतरराष्ट्रीय