शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कराचीच्या मंदिरात भरते हिंदू मुलांची शाळा; वस्तीत राहतात केवळ ८० कुटुंबे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 06:48 IST

मुस्लीम शिक्षिकेने उचलला विडा : विद्यार्थ्यांना शिक्षित करणार

कराची : पाकिस्तानातील कराची शहरात एका मंदिरात शाळा भरते. या शाळेत शिकणाऱ्या हिंदू मुलांना शिक्षित करण्याचा विडा एका मुस्लिम महिलेने उचलला आहे. या शिक्षिकेचे नाव आहे अनम आगा. या शिक्षिका शाळेत येताच ही मुले त्यांचे ‘जय श्रीराम’म्हणून स्वागत करतात.शहरातील बस्ती गुरु भागात अनम एका मंदिरात ही शाळा चालवितात. हिंदू वस्ती असलेल्या भागात ही शाळा आहे. या भागात ८० ते ९० हिंदू कुटुंबे राहतात. अनम यांनी प्रतिकूल परिस्थितीत या मुलांना शिक्षित करण्याचा विडा उचलला आहे. शाळेत येताच अनम स्मितहास्य करत या मुलांना म्हणतात, ‘सलाम.’ आणि ही मुलेही प्रत्युत्तरात म्हणतात, ‘जय श्रीराम.’अनम यांनी सांगितले की, जेव्हा आम्ही मंदिरातील शाळेबाबत लोकांना सांगतो तेव्हा लोकही आश्चर्यचकीत होतात. मात्र, आमच्याकडे शाळा चालविण्यासाठी दुसरी जागा नाही. आपले येथे येणे आजूबाजूच्या मुस्लिम कुटुंबांना पसंत नाही. मात्र, मी हे काम करते. कारण, या लोकांना आपल्या मूलभूत अधिकारांबाबत माहिती नाही. ही मुले शिक्षण घेऊ इच्छितात. यातील काही मुले जवळच्या शाळेतही शिकायला गेले. पण, त्यांना तिथे सामाजिक आणि धार्मिक समस्या आल्या. अनम म्हणतात की, मी कधीच धर्मावर बोलत नाही. कुणाच्याही भावना दुखावल्या जातील असे बोलत नाही. मी विविध विषयांवर त्यांचे लक्ष केंद्रीत करते. धर्म यात कुठेच येत नाही.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानEducationशिक्षण