शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय-अमेरिकन विद्यार्थ्यांनी बनविले स्कॉलरली अ‍ॅप

By admin | Updated: March 18, 2016 01:55 IST

दोन भारतीय-अमेरिकन विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ते (विद्यार्थी) ज्या भागात राहतात तेथील शिक्षकाशी जोडले जाण्यास मदत करणारे अ‍ॅप्लिकेशन (अ‍ॅप) तयार केले आहे.

होस्टन : दोन भारतीय-अमेरिकन विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ते (विद्यार्थी) ज्या भागात राहतात तेथील शिक्षकाशी जोडले जाण्यास मदत करणारे अ‍ॅप्लिकेशन (अ‍ॅप) तयार केले आहे. हे अ‍ॅप तयार करणारे सुलतान खान आणि हसीथ सांका हे युनिव्हर्सिटी आॅफ कॅलिफोर्निया, रिव्हरसाईडमध्ये (यूसीआर) संगणक शाखेचे विद्यार्थी आहेत. गेल्या वर्षी आॅक्टोबरमध्ये भरलेल्या जगातील सर्वात मोठ्या शैक्षणिक प्रदर्शनामध्ये या दोघांनी बनविलेल्या अ‍ॅपला पहिला क्रमांक मिळाला होता.या अ‍ॅपचे नाव ‘स्कॉलरली’ असे असून गुगल प्ले आणि अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवर ते मोफत डाऊनलोड करता येते. हे अ‍ॅप ट्यूटर प्रोफाईल्स बघायला, शिक्षकाला भेटण्यासाठी ठिकाण ठरवायला आणि एक बटण दाबताच आपला अभ्यास करायला मदत करते.या अ‍ॅपचा शिक्षक (ट्यूटर) आणि विद्यार्थी अशा दोघांनाही फायदा आहे. शिक्षकाला यातून जास्त पैसे मिळू शकतील आणि विद्यार्थ्याला आवश्यक तेव्हा शिक्षकाची मदत घेता येईल. यासाठी वापरायचा आहे तो फक्त स्मार्टफोन. शिक्षकाची सेवा उपलब्ध होण्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी सोय होईल, असे सांका आणि खान यांनी सांगितले.खान आणि सांका यांनी गेल्या वर्षी आॅक्टोबरमध्ये ‘हॅकिंग एज्यू’मध्ये ‘स्कॉलरली’चे अँड्रॉईड व्हर्जन विकसित केले होते. तेथील स्पर्धेमध्ये जगातील विद्यापीठांतून सुमारे एक हजार हॅकर्स सहभागी झाले होते. शिक्षण व्यवस्थेचा दर्जा सुधारण्यासाठी या विद्यार्थ्यांना त्यांच्या कल्पना प्रत्यक्ष सॉफ्टवेअरमध्ये रूपांतरित करून दाखवायच्या होत्या. त्यासाठी वेळ दिला होता फक्त ३६ तासांचा. खान आणि सांका यांनी निवड समितीसमोर ‘स्कॉलरली’चे सादरीकरण करून या अ‍ॅपसाठी पहिला क्रमांक पटकावला. तेव्हापासून हे दोघे अँड्रॉईड अ‍ॅप सुधारण्याचे आणि आयओएस व्हर्जन तयार करण्याच्या कामात गुंतले होते. (वृत्तसंस्था)