शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सय्यद सलाउद्दीन दहशतवादी नाही, पाकच्या उच्चायुक्तांनी केली पाठराखण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2017 09:45 IST

भारतातील पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांना आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केलेल्या हिजबुल मुजाहिद्दीनचा म्होरक्या सय्यद सलाउद्दीनचा पुळका आला आहे.  सलाउद्दीनबाबत प्रतिक्रिया देताना बासित म्हणाले की, ''पाकिस्तान सलाउद्दीनला दहशतवाद्याच्या स्वरुपात पाहत नाही. सलाउद्दीन काश्मिरींच्या अधिकारांसाठी लढत आहेत. जेथे पाकिस्तानचा मुद्दा आहे तर आम्ही सलाउद्दीनला एखाद्या दहशतवादी म्हणून पाहत नाही'', असे सांगत बासित यांनी सलाउद्दीनची पाठराखण केली आहे. 

नवी दिल्ली, दि. 2 - भारतातील पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांना आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केलेल्या हिजबुल मुजाहिद्दीनचा म्होरक्या सय्यद सलाउद्दीनचा पुळका आला आहे.  सलाउद्दीनबाबत प्रतिक्रिया देताना बासित म्हणाले की, ''पाकिस्तान सलाउद्दीनला दहशतवाद्याच्या स्वरुपात पाहत नाही. सलाउद्दीन काश्मिरींच्या अधिकारांसाठी लढत आहेत. जेथे पाकिस्तानचा मुद्दा आहे तर आम्ही सलाउद्दीनला एखाद्या दहशतवादी म्हणून पाहत नाही'', असे सांगत बासित यांनी सलाउद्दीनची पाठराखण केली आहे. 

ज्यावेळी सलाउद्दीनची आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषणा करण्यात आली होती त्यावेळी देखील पाकिस्ताननं सलाउद्दीनचा बचाव करण्याचा प्रयत्न केला आहोत. ''काश्मीरमधील नागरिकांच्या हक्काविषयी बोलणाऱ्याला दहशतवादी घोषित करणं अयोग्य आहे'', असे सांगत पाकिस्तानने सलाउद्दीनचा बचाव केला होता.  

पुढे बासित असेही म्हणाले आहेत की, ''तो जे काही करत आहे, त्याकडे पाकिस्तान व जम्मू काश्मीरच्या स्वयंनिर्णय अधिकारासाठीची लढाई या स्वरुपात पाहिले जाते. अमेरिकेने दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिद्दीनचा म्होरक्या सय्यद सलाऊद्दीनला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले आहे. या निर्णयाशी आम्ही सहमत नाही आणि आम्ही या निर्णयावर आक्षेपही नोंदवला होता''.  

दरम्यान, NIAच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीतही सलाउद्दीनचा समावेश आहे. अमेरिकेने हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी सय्यद सलाऊद्दीनला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले. काश्मीरमध्ये वाढलेल्या हिजबुलच्या वाढत्या दहशतवादी कारवायांचीही दखल अमेरिकेने घेतली आहे.  

कोण आहे सय्यद सलाउद्दीन ?दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिद्दीन या संघटनेचा सय्यद सलाउद्दीन प्रमुख आहे. या संघटनेने जम्मू आणि काश्मीरसह भारतात अनेक दहशतवादी हल्ले केले आहेत. 2014 मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाची जबाबदारीही सय्यद सलाउद्दीनच्या संघटनेनेच घेतली होती. या हल्ल्यात 17 जण जखमी झाले होते.

तर दुसरीकडे दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदसंदर्भात विचारले असता बासित म्हणाले की, सईदला नजरकैदेत ठेवण्यात आले असून आम्ही हाफिजविरोधात अधिक पुरावे मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत. पुरेसे पुरावे मिळवण्यात यश आले की पुढील कारवाई करण्यात येईल. हाफिज सईद 31 जानेवारीपासून नजरकैदेत आहे.  हाफिजसहीत अब्दुल्ला उबैद, मलिक जफर इकबाल, अब्दुल रहमान आबिद व काजी आसिफ हुसैन या चार जणांनादेखील ताब्यात घेण्यात आले आहे.