शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

सौदी महिलेने गायकाला स्टेजवर मिठी मारली...अन्....

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2018 12:43 IST

मोहान्दीसला अरबी गायनाचा राजकुमार असं म्हटलं जातं. त्यानं अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. इराकमध्ये जन्मलेल्या मोहान्दीसने सौदी अरेबियाचे नागरिकत्व स्वीकारले आहे.

रियाध- सौदी अरेबिया आता थोडा मोकळा होतोय, महिलांना वाहन चालवण्याचा अधिकार दिला जात आहे, चित्रपटगृहांना सुरुवात होत आहे म्हणजे आता इतर जगासारखा हा देश मोकळाढाकळा झाला असं तुम्हाला वाटेल. पण नाही सौदी अरेबियात असं स्वतंत्र जगण्याचं वारं अजून तरी लवकर वाहू लागेल असं दिसत नाही. एका सांगितिक मैफिलित गाणं पूर्ण झाल्यावर एका सौदी महिलेने गायकाला मिठी मारली. त्यानंतर तिच्या  या "अपराधा" बद्दल तिला अटक करण्यात आली आहे.

सौदी अरेबियातील ताइफमध्ये माजिद अल मोहान्दीस या गायकाची मैफल झाल्यानंतर एक महिला पळत थेट स्टेजवर गेली आणि तिने त्याला मिठी मारली. सौदी अरेबियामध्ये महिला आणि पुरुषांना असे मोकळेपणाने वावरण्यास, कृती करण्यास बंदी आहे.  त्यामुळे या महिलेला तात्काळ अटक करुन तिच्यावर पुढील कारवाई सुरु करण्यात आली.महिलेने गायकाला मिठी मारली आहे आणि सुरक्षारक्षक तिला त्याच्यापासून बाजूला करत आहेत असे व्हीडीओही प्रसिद्ध झाले आहेत. मोहान्दीसला अरबी गायनाचा राजकुमार असं म्हटलं जातं. त्यानं अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. इराकमध्ये जन्मलेल्या मोहान्दीसने सौदी अरेबियाचे नागरिकत्व स्वीकारले आहे. हा प्रकार झाल्यानंतर त्यानं कार्यक्रम सुरुच ठेवला.

सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये महिलांना यापुर्वी अनेक वर्षे मज्जाव करण्यात आला होता. मात्र गेल्या वर्षी प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी ही बंदी उठवली होती. तसेच महिलांसाठी मैफिली आणि फूटबॉल सामन्यांचेही आयोजन करण्यात आले. इतकेच नव्हे तर लेबनिज गायिका हिबा तावाजी हीची मैफिलही आयोजित करण्यात आली. त्यानंतर महिलांना कार चालवण्यास परवानगी देण्यात आली मात्र असे सगळे असले तरी सौदी आपल्या जुनाट सार्वजनिक संकेत-नियमांमधून बाहेर आलेला नाही.

टॅग्स :saudi arabiaसौदी अरेबियाWomenमहिला