शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सौदीत अल्पवयीन मुलास देहांताऐवजी १२ वर्षांचा कारावास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2019 10:38 IST

आंतरराष्ट्रीय दडपणामुळे आता या मुलाला १२ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

बैरुत : सरकारविरोधी निदर्शने करणाऱ्या, दहशतवादी संघटनेत सामील झाल्याचा आरोप असलेल्या सौदी अरेबियातील एका अल्पवयीन मुलाला देहांताची शिक्षा देण्याचा विचार सुरू होता. मात्र आंतरराष्ट्रीय दडपणामुळे आता या मुलाला १२ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.मूर्तझा कुएरिस असे या मुलाचे नाव आहे. तो शियापंथीय असून आता अठरा वर्षांचा आहे. मूर्तझा १0 वर्षांचा असताना सरकारविरोधी निदर्शनांत सहभागी झाला होता. हाती शस्त्र घेऊन दहशतवादी बनला होता असे त्याच्यावर आरोप आहेत. मूर्तझाला वयाच्या तेराव्या वर्षी अटक करण्यात आली. तेव्हापासून तो तुरुंगातच आहे.त्याला न्यायालय देहांताची शिक्षा देण्याच्या विचारात आहे याची कुणकुण मानवी हक्क गटांना लागली होती. मूर्तझाच्या प्रकरणाचा गेली अनेक वर्षे युरोपियन सौदी आॅर्गनायझेशन फॉर 'ुमन राइट्स या संघटनेकडून पाठपुरावा करण्यात येत होता. या संघटनेचे संचालक अली अदूबिसी यांनी सांगितले की, मूर्तझाला चांगल्या वागणुकीच्या अटीवर (प्रोबेशन) चार वर्षे ठेवण्यात येईल. त्याची आधीच चार वर्षांची शिक्षा भोगून झालेली आहे. आणखी तीन वर्ष शिक्षा भोगल्यानंतर २0२२ मध्ये त्याची मुक्तता होईल.सौदी राजघराण्याच्या विरोधकांना तसेच शियापंथीय आरोपींना तेथील न्यायालये अत्यंत कडक शिक्षा सुनावतात. मात्र एखाद्या अल्पवयीन मुलाला कठोर शिक्षा सुनावण्याचा सौदी अरेबियातील हा विरळा प्रसंग आहे. >३७ जणांना मृत्युदंडसौदी अरेबियाने देहांत शिक्षेचे कायमच समर्थन केले आहे. तिथे गुन्हेगाराचा शिरच्छेद केला जातो. यंदाच्या वर्षी सौदी अरेबियामध्ये ३७ गुन्हेगारांना देहांताची शिक्षा देण्यात आली. त्यातील बहुसंख्य आरोपी शियापंथीय होते. दहशतवादी कारवायांत सहभागी झाल्याचा आरोप त्यांच्यावर होता.