दुबई : खिडकी नसलेल्या घराला लागलेल्या भीषण आगीत भारतीयांसह ११ विदेशी कामगार ठार झाले असून, अन्य सहा जण जखमी झाले आहेत. सौदी अरबमधील दक्षिणेकडील नाजरन शहरात ही शोकांतिका घडली. या घरात हे सर्व एकत्र राहायचे. हवा खेळती राहण्यासाठी या घराला खिडक्या नसल्याने धुरामुळे श्वास गुदमरून ११ जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती सौदी नागरी संरक्षण विभागाने दिली.
सौदीत आग; भारतीयांसह ११ विदेशी कामगार ठार
By admin | Updated: July 13, 2017 05:10 IST