शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीचा येमेनच्या बंदरावर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2018 14:53 IST

बुधवारी सकाळपासून सौदी अरेबियाने हुदायदाच्या आसपास हौती बंडखोरांच्या केंद्रावर हल्ला चढवला

सना- सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती म्हणजेच युएइने येमेनच्या बंदरावर हल्ला चढवला आहे. हुदायदा हे सौदीचे सर्वात मोठे बंदर आहे. गेली तीन वर्षे हौती बंडखोर आणि सौदी अरेबिया यांच्यामध्ये गेली तीन वर्षे लढाई सुरु आहे. गेल्या महिन्यात युएईने येमेनचे सोकोत्रा बेट ताब्यात घेतले होते. त्यामुळे या परिसरात तणाव अधिकच वाढला होता.बुधवारी सकाळपासून सौदी अरेबियाने हुदायदाच्या आसपास हौती बंडखोरांच्या केंद्रावर हल्ला चढवला. त्यांना येमेनच्या सैनिकांच्या तुकडीनेही मदत केली. हुदायदा ताब्यात घेतल्यामुळे येमेनमधून बंडखोरांच्या गटाला बाहेर काढण्यात यश मिळेल असे बोलले जात आहे.हे तांबड्या समुद्राच्या काठावर असणारे बंदर सौदी आणि येमेन सरकारच्या ताब्यात आल्यामुळे बाब अल-मंदाब सामुद्रधुनीवर ताबा मिळवणे शक्य होणार आहे. तसेच इराणचा बंडखोरांशी संपर्क तोडणेही आता शक्य होणार आहे. येमेनमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात दुष्काळ असून दुष्काळाने होरपळलेल्या जनतेला येथून रसद पुरवता येईल. हुदायदामध्ये 6 लाख लोक राहातात. त्या सर्वांना दुष्काळाची आणि युद्धाची झळ बसलेली आहे.

सोकोत्राची लढाई-  मे महिन्याच्या सुरुवातील सोकोत्रावर संयुक्त अरब अमिरातीने 300 सैनिकांना पाठवले तसेच रणगाडेही बेटावर पाठवलेय मात्र सोकोत्राच्या रहिवाश्यांनी याला तीव्र विरोध केला. सोकोत्राचे गव्हर्नर हाशिम साद अल- साकात्री यांनी संयुक्त अरब अमिरातीच्या या निर्णयाचा निषेध केला आणि हा हल्ला म्हणजे येमेनच्या सार्वभौमत्त्वावर हल्ला आहे असे त्यांनी मत व्यक्त केले. इतके दिवस येमेन युद्धामध्ये सोकोत्रा दूर असल्यामुळे ओढले गेले नव्हते मात्र युएईच्या हल्ल्यामुळे सोकोत्रालाही फरफटत नेण्यात आले. युएईने सी-17 विमानांच्या मदतीने 2 बीएमपी-3 रणगाडे, शस्त्रास्त्रे असणारी वाहने आणि 100 फौजा तेथे उतरवल्या, दोन वर्षांपुर्वीत सोकोत्रावर लष्करी तळही उभारण्यात आला होता. या सर्व कृतीचे युएईचे  परराष्ट्रमंत्री अन्वर गर्गश यांनी केले होते, आमचे सोकोत्राच्या नागरिकांशी ऐतिहासिक व कौटुंबिक संबंध आहेत असे विधान करुन हे संबंध पुन्हा एकदा प्रस्थापित करत आहोत असे युएईच्या कृतीचे समर्थन त्यांनी केले होते.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीय