शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

हज यात्रेकरूंसाठी सौदी अरेबिया सरकारचा मोठा निर्णय; जगभरातील मुस्लिमांना फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2023 09:18 IST

सौदी अरेबिया सरकार हज आणि उमराह यात्रेकरूंसाठी प्रक्रिया सुलभ करण्याचा प्रयत्न करत आहे.

नवी दिल्ली - दरवर्षी भारतातून मोठ्या संख्येने लोक हज आणि उमराह करण्यासाठी सौदी अरेबियाला पोहोचतात. अशा परिस्थितीत भारतासह जगभरातून हजला जाणार्‍या यात्रेकरूंबाबत सौदी अरेबिया सरकार लवकरच मोठे पाऊल उचलणार आहे. सौदी सरकारच्या या निर्णयाचा फायदा जगभरातील कोट्यवधी लोकांना जे हजला जाऊ इच्छितात त्यांना होणार आहे.  

सरकार आता हजसाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म लॉन्च करणार आहे. सौदी अरेबिया सरकारच्या या पावलाचा फायदा केवळ हजलाच नाही तर उमराहसाठी येणाऱ्या लोकांनाही होणार आहे. सौदी अरेबिया सरकारच्या या ऑनलाइन सुविधेद्वारे भारतासह इतर देशांतून जाणारे लोक सहज हजसाठी अर्ज करू शकतात.

हज यात्रा २०२३ साठी नोंदणी सुरू गुरुवारी, सौदी अरेबिया सरकारने जाहीर केले की, २०२३ मध्ये हजसाठी नोंदणी सेवा सुरू झाली आहे. केवळ सौदी अरेबियाचे नागरिक आणि तेथे राहणारे मुस्लिम प्रवासी हजसाठी अर्ज करू शकतात. सौदी अरेबिया सरकारच्या वतीने ट्विट करून ही माहिती देण्यात आली आहे. सौदी सरकारकडून इतर देशांतील लोकांची नोंदणी अद्याप सुरू झालेली नाही. सौदीमध्ये राहणारे लोक localhaj.haj.gov.sa द्वारे अर्ज करू शकतात. जे लोक फक्त सौदी अरेबियात राहतात, त्यांची हजसाठी निवड ऑनलाइन लॉटरी प्रणाली अंतर्गत केली जाते. अर्ज करणाऱ्यांपैकी ज्यांची नावे लॉटरीत येतात त्यांनाच हज करण्याची परवानगी आहे. मात्र, उमराहसाठी अशी कोणतीही व्यवस्था नाही.

सौदी अरेबिया सरकार हज आणि उमराह यात्रेकरूंसाठी प्रक्रिया सुलभ करण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या काही महिन्यांत हज आणि उमराहच्या प्रक्रियेतही अनेक बदल करण्यात आले आहेत. अलीकडेच सौदी अरेबिया सरकारने हजला जाणाऱ्या महिलांबाबत मोठा निर्णय घेतला होता. नव्या निर्णयानुसार आता महिला कोणत्याही पुरुष साथीदाराशिवाय (महरम) हजला जाऊ शकतात. तर यापूर्वी असा कोणताही नियम नव्हता. हजला जाण्यासाठी एक महरम असणे आवश्यक होते. अनेकदा महिलेचा नवरा, मुलगा किंवा भाऊ महरम म्हणून एकत्र हजला जातात.

त्याचवेळी, नुकतेच सौदी अरेबियाने उमराहसाठी व्हिसाच्या नियमांबाबतही अनेक बदल केले आहेत. सौदी अरेबिया सरकारने इतर देशांतून येणाऱ्या लोकांसाठी उमराह व्हिसाची मर्यादा ३० दिवसांवरून ९० दिवसांपर्यंत वाढवली आहे. उमरा व्हिसातील या बदलाचा अर्थ असा आहे की, जे उमराह करण्यासाठी सौदी अरेबियात पोहोचतात, त्यांना आधी केवळ ३० दिवस देशात राहण्याची परवानगी होती, परंतु आता ते कोणत्याही उल्लंघनाशिवाय सौदी अरेबियामध्ये ९० दिवस राहू शकतात. 

टॅग्स :saudi arabiaसौदी अरेबियाMuslimमुस्लीम