शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

यंदाही भारतीयांना हज यात्रेची संधी नाही; कोरोनामुळे परदेशींना प्रवेश नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2021 12:49 IST

सौदी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय; भारतासह जगभरातील इच्छुक भाविकांची निराशा

- जमीर काझीमुंबई- दरवर्षी जगभरातून कोट्यवधी भाविक जमणाऱ्या  सौदी अरेबियातील हज यात्रेसाठी यंदा भारतासह सर्व परदेशी नागरिकांना मज्जाव करण्यात आला आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सौदी सरकारने गुरुवारी हा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे भारतासह जगभरातील इच्छुक भाविकांची मोठी निराशा झाली आहे.मक्का मदिना येथे येत्या २० जुलै पासून  भरणाऱ्या या पवित्र यात्रेत यावर्षीही केवळ स्थानिक ६० हजार नागरिकांना अनुमती दिली जाणार आहे.  सौदी सरकारने त्याबाबत हज कमिटी ऑफ इंडियाला कळविले आहे.हज यात्रेला दरवर्षी सुमारे पावणे दोन लाख भारतीय सहभागी होत असतात. मात्र २०२० पासून कोरोनामुळे  त्यामध्ये खंड पडला असून एकही भाविक तेथे जाऊ शकलेला नाही गेल्यावर्षी भारतीयासह  एकाही परदेशी नागरिकांना परवानगी देण्यात आलेली नव्हती. तरीही यंदा लसीकरण व  सर्व आवश्यक खबरदारी घेऊन  काहींना परवानगी दिली परवानगी दिली जाईल, अशी शक्यता असल्याने हज कमिटी ऑफ इंडियाच्यावतीने त्याबाबत तयारी करण्यात आली होती. बुधवारी केंद्रीय अल्पसंख्याक विकास मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी मुंबईत हज हाऊसला बैठक घेऊन त्याचा आढावा घेतला होता. निर्बंधाच्या  आदेशानुसार किमान  एक हजार  तर काही अटी शिथिल केल्यास ५,९००  भारतीयांना संधी मिळेल, अशी आशा होती, त्यासाठी सौदी सरकारच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून होते.  कोविड-१९ चे संकट अद्याप कमी झाले  नसल्याने हजच्या विधीसाठी परदेशी नागरिकांना यावर्षी प्रवेश न देण्याचा निर्णय घेण्यात आला. सौदीत स्थायिक असलेल्या आणि दोन लस घेतलेल्या केवळ६० हजार इच्छुकांना सर्व अटींचे पालन करून  हज यात्रेचा विधी करण्याची अनुमती देण्यात आलेली आहे की नाही याबद्दल अद्याप त्यांच्यकडून ठरविण्यात आलेले नाही. यावर्षी हज कमिटीकडे ५८ हजार इच्छुकांनी अर्ज केले होते. मात्र त्यापैकी केवळ १ हजार जणांनी दोन लस घेतले होते. . सौदी सरकारचा निर्णय मान्यअटी व निर्बंधाच्या आधारे काही भारतीयांना हजसाठी परवानगी मिळेल अशी आशा होती. मात्र सौदी सरकारने आरोग्याच्या दृष्टीने  बाहेरच्या नागरिकांना यंदाही मज्जाव केले आहे. त्यामुळे यंदा कोणालाही जाता येणार नाही.- डॉ. मकसूद अहमद खान( मुख्य कार्यकारी अधिकारी, हज कमिटी ऑफ इंडिया).

टॅग्स :Haj yatraहज यात्राcorona virusकोरोना वायरस बातम्या