शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

‘वाह... गुरू’... शनीला टाकले मागे! चंद्रांची संख्या आणखी वाढणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2023 09:16 IST

एकेकाळी मोठे चंद्र एकमेकांवर किंवा धूमकेतूवर किंवा लघुग्रहांवर आदळून त्यांचे लहान चंद्र झाले असावेत.

केप कॅनाव्हेरल (अमेरिका) : गुरू ग्रहाभोवतीच्या आणखी १२ चंद्रांचा शोध लागला असून, त्या भोवतीच्या एकूण चंद्रांची संख्या विक्रमी ९२ झाली आहे. आतापर्यंत सर्वाधिक ८३ चंद्र शनीभोवती आहेत, अशी माहिती होती; परंतु याबाबतीत आता गुरूने शनीला आता मागे टाकले आहे. इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियनच्या मानयर प्लॅनेट सेंटरने अलीकडे जारी केलेल्या अहवालात गुरू ग्रहाभोवती आणखी १२ चंद्र असल्याचे म्हटले आहे. 

मूळ जाणू शकणार -एप्रिल महिन्यात युरोपियन स्पेस एजन्सी गुरू ग्रह आणि त्याच्या काही मोठ्या, बर्फाळ चंद्रांचा अभ्यास करण्यासाठी एक यान पाठवणार आहे. 

पुढील वर्षी नासा गुरूच्या चंद्रांचा अभ्यास करण्यासाठी युरोपा क्लिपर नामक मोहीम राबविणार आहे. आगामी काळात या बाह्य चंद्रांपैकी प्रत्येकाचा आपण अभ्यास करून त्यांचे मूळ जाणू शकणार आहोत. 

आकार किती मोठा? - नवीन चंद्र आकाराने ०.६ मैल ते २ मैल (१ किलोमीटर ते ३ किलोमीटर) एवढे- गुरूच्या नवीन चंद्रांना अद्याप नावे दिलेली नाहीत. निम्मे चंद्र नाव देण्याइतपत मोठे.

चंद्रांची संख्या आणखी वाढणार २०२१ आणि २०२२ मध्ये हवाई आणि चिलीमधील दुर्बिणींच्या साहाय्याने प्रदीर्घ काळ निरीक्षणे नोंदवल्यानंतर या नवीन चंद्रांचा शोध लागला. दोन्ही ग्रहांच्या चंद्रांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. - स्कॉट शेपर्ड, ‘कार्नेगी’ संस्था

कसे तयार झाले चंद्र? : एकेकाळी मोठे चंद्र एकमेकांवर किंवा धूमकेतूवर किंवा लघुग्रहांवर आदळून त्यांचे लहान चंद्र झाले असावेत.