शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
3
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
4
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
5
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
6
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
7
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
8
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
9
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
10
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
11
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
12
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
13
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
14
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
15
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
16
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
17
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
18
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
19
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
20
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला

रशियात असं नेमकं काय म्हणाले परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर की चीनला आनंदाच्या उकळ्या फुटल्या? वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2022 11:38 IST

भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मंगळवारी मॉक्सोत आयोजित परिषदेत रशियाकडून तेल खरेदीचं समर्थन करताना देशासाठी ते कसं फायदेशीर ठरलं हे समजावून सांगितलं.

बीजिंग-

भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मंगळवारी मॉक्सोत आयोजित परिषदेत रशियाकडून तेल खरेदीचं समर्थन करताना देशासाठी ते कसं फायदेशीर ठरलं हे समजावून सांगितलं. तसंच यापुढेही रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहिल असंही ठामपणे मत मांडलं. मॉक्सोत रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांच्या भेटीत जयशंकर यांनी केलेलं हे विधान पाश्चात्य देशांना दिलेलं एक खणखणीत प्रत्युत्तर मानलं जात आहे. रशियाकडून तेल खरेदी न करण्यासाठी पाश्चिमात्य देशांकडून भारतावर वारंवार दबाव वाढत आहे. याआधीही जयशंतर यांनी जागतिक व्यासपीठावरुन भारत-रशिया संबंधांवर केल्या केलेल्या प्रश्नांना सडेतोड उत्तरं दिली आहेत. पण अमेरिकेसोबत तणावपूर्ण संबंध राहिलेल्या चीनला मात्र भारताच्या विधानानं आनंदाच्या उकळ्या फुटल्या आहेत. 

जयशंकर यांनी केलेल्या विधानाचं कौतुक करत चीनचे सरकारी माध्यम असलेल्या ग्लोबल टाइम्सचे पत्रकार हू शिजिन यांनी एक ट्विट केलं आहे. "भारत हा एक स्वतंत्र मुत्सद्देगिरी असलेला देश आहे, ज्याने जगभरात आपला प्रभाव वाढवण्यासाठी दारे उघडली आहेत. भारताचा व्यापक आंतरराष्ट्रीय प्रभाव अमेरिका वगळता इतर अनेक पाश्चात्य देशांना मागे टाकेल अशी अपेक्षा केली जाऊ शकते", असं ट्विट हू शिजिन यांनी केलं आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्ध फेब्रुवारी २०२२ मध्ये सुरू झाले. यानंतर रशियावर एक एक करून अनेक निर्बंध लादले जाऊ लागले. मात्र भारताने तटस्थ धोरण अवलंबून रशियाकडून तेल खरेदी सुरूच ठेवली.

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर रशियात युनायटेड नेशन्सपासून ते एससीओपर्यंत भारताने उघडपणे युद्ध आणि हिंसाचाराचा निषेध केला आहे. रशियासोबतच्या व्यापारी संबंधांमुळे पाश्चात्य देश भारतावर नाराज आहेत. दरम्यान, जयशंकर दोन दिवसांच्या दौऱ्यावर मंगळवारी मॉस्कोला पोहोचले. भारत-रशिया संबंधांवर बोलताना परराष्ट्र मंत्री म्हणाले की, दोन्ही देशांमध्ये अतिशय मजबूत आणि वेळोवेळी अडचणीच्या काळात ठामपणे उभे राहणारे असे संबंध आहेत. कोरोना व्हायरस, आर्थिक दबाव आणि व्यावसायिक अडचणींचा जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. आता यावर आपण युक्रेन युद्धाचा परिणाम देखील पाहत आहोत. 

संवादातून जागतिक आणि प्रादेशिक समस्या सोडवू"दहशतवाद आणि हवामान बदल या बारमाही समस्या आहेत. दोन्हीचा विकासावर वाईट परिणाम होतो. आमची चर्चा एकूण जागतिक परिस्थिती तसेच काही प्रादेशिक समस्यांवर लक्ष केंद्रित करेल", असं जयशंकर म्हणाले. सप्टेंबरमध्ये, चीनच्या सरकारी ग्लोबल टाईम्सने जयशंकर यांच्या विधानाचा हवाला देत म्हटलं होतं की अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत आम्ही भारताच्या स्वतंत्र परराष्ट्र धोरणाचा आदर करतो आणि धोरणात्मक संयम पाहून आनंद होतो. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशिया