शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

Russia Nuclear Weapon: अणुबॉम्बनं सज्ज असलेली रशियन फायटर जेट्स स्‍वीडनच्या सीमेत शिरली, युरोपात दहशत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 15:41 IST

युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान रशियाची दोन लढाऊ विमानं स्वीडनच्या हवाई हद्दीत घुसली आहेत. ही रशियन विमानं सुखोई-२७ आणि सुखोई-२४ अणुबॉम्बनं सुसज्ज होती.

स्‍टॉकहोम: 

युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान रशियाची दोन लढाऊ विमानं स्वीडनच्या हवाई हद्दीत घुसली आहेत. ही रशियन विमानं सुखोई-२७ आणि सुखोई-२४ अणुबॉम्बनं सुसज्ज होती. रशियन विमानांनी स्वीडनच्या हवाई क्षेत्रात जाणूनबुजून प्रवेश केल्याचं सांगण्यात येत आहे. 'नाटो' देशांच्या अगदी जवळ असलेल्या कॅलिनिनग्राड हवाई तळावरून २ मार्च रोजी रशियन लढाऊ विमानांनी उड्डाण केले. रशियन विमानं स्वीडनच्या गॉटलँड बेटांच्या दिशेनं जात होती.

TV4 Nyheter च्या रिपोर्टनुसार, 'नाटो' सदस्य आणि स्वीडन तसंच फिनलँडसारखे तटस्थ देश किती वेळात प्रतिक्रिया देतात हे जाणून घेण्यासाठी जाणूनबुजून रशियन फायटर जेट्सनंनं स्वीडच्या हद्दीत प्रवेश केला होता. पण रशियन विमानंनी घुसखोरी करताच स्वीडिश हवाई दल पूर्णपणे सतर्क होतं आणि त्यांनी त्वरित प्रत्युत्तर दिलं. युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर स्वीडिश हवाई दल अलर्ट मोडवर आहे. दरम्यान, घुसखोरीच्या वेळी रशियन विमानं अणुबॉम्बनं सज्ज होती, अशी माहिती आता समोर आली आहे.

'रशियाकडून बेजबाबदार, अव्यावसायिक वर्तन'दोन्ही सुखोई विमानांमध्ये घुसखोरीच्या वेळी अण्वस्त्रं होती, असं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. स्वीडनसाठी हा एक इशाराच आहे. आमच्याकडे अण्वस्त्र आहेत आणि त्यांचा वापर करण्यासाठी आम्ही कुणालाही घाबरत नाही असं रशियानं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, असं लष्करी विश्लेषक स्टीफन रिंग म्हणालेय. "आम्हाला विश्वास आहे की रशियानं हे हेतुपुरस्सर केलं आहे, जे खूप गंभीर आहे कारण तुम्ही सध्या युद्धाला समोरं जाणारा देश आहात. अशा काळात असं काही करणं योग्य नाही", असं स्वीडिश हवाई दलाचे प्रमुख कार्ल जोहान इडस्ट्रोम म्हणाले.

रशियन लढाऊ विमाने स्वीडिश हवाई क्षेत्रात काही काळासाठीच होती, जी कदाचित एक मिनिटाच्या जवळपास होती. त्यानंतर ती त्यांच्या रशियन प्रदेशात परतली, असं कार्ल जोहान म्हणाले. रशियाच्या बाजूनं हे बेजबाबदार आणि अव्यावसायिक वर्तन आहे, असंही ते पुढे म्हणाले आहेत. स्वीडन हा नाटोचा सदस्य देश नाही, परंतु स्वीडनच्या सैन्यानं अनेक वेळा नाटो देशांच्या सैन्यासोबत लष्करी मोहिमांमध्ये भाग घेतला आहे. या खुलाशानंतर युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाची अण्वस्त्र कारवाईची भीती पुन्हा वाढली आहे.

टॅग्स :russiaरशियाRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिन