शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

पुतीन यांच्या राईटहँडच्या मुलीची लँड क्रूझर बॉम्बने उडविली; मॉस्कोजवळ हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2022 08:37 IST

ब्रिटनने रशियाच्या लोकांवर लादलेल्या निर्बंधांमध्ये डारिया डुगिनचा समावेश करण्यात आला होता. ती लेखिका होती.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या सहकाऱ्यांना धक्के बसू लागले आहेत. युक्रेन युद्धात अनेक सहकारी कमांडर मारले गेले आहेत. काही दिवसांपूर्वीच युक्रेन युद्धासाठी महत्वाचा असा एअरबेसच उडवून दिल्याने रशियन सैन्याला मोठा धक्का बसला आहे. असे असताना आता पुतीन यांचा राईट हँड समजल्या जाणाऱ्या मुत्सद्दीच्या मुलीची कार बॉम्बने उडवून देत हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. 

अलेक्झांडर डुगिन यांची मुलगी डारिया हिची हत्या करण्यात आली आहे. डारियाही आपल्या लँड क्रूझर प्राडे कारमधून घरी जात होती, तेव्हा तिच्या कारला मॉस्कोजवळ बॉम्बस्फोट करून उडवून देण्यात आले. स्फोट झाल्यानंतर घटनास्थळी मोठी खळबळ उडाली. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. यानंतर त्यांच्यामागोमाग अलेक्झांडरदेखील तिथे पोहोचले. 

रशियन मीडियानुसार मॉस्कोच्या ओडिंट्सोवस्की जिल्ह्यात कारवर बॉम्ब टाकण्यात आला. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात या कारमध्ये डारिया असल्याचे समोर आले आणि मॉस्कोपर्यंत या स्फोटाची झळ पोहोचली. रस्त्यात अचानक स्फोट झाल्याने आगीचे लोळ उठले होते. यामुळे वाहतूक अचानक थांबली होती. कार पूर्णपणे उध्वस्त झाली होती. 

ब्रिटनने रशियाच्या लोकांवर लादलेल्या निर्बंधांमध्ये डारिया डुगिनचा समावेश करण्यात आला होता. ती लेखिका होती. अलेक्झांडर डुगिन हे प्रसिद्ध रशियन राजकीय तत्वज्ञानी आणि विश्लेषक आहेत. क्रिमिया आणि युक्रेन युद्धामागे त्यांचा हात असल्याचे बोलले जाते. अलेक्झांडरला पाश्चात्य विश्लेषकांनी पुतीनचा मेंदू म्हणून संबोधले होते.  आतापर्यंत रशियन अधिकाऱ्यांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. सरकारमध्ये अधिकृत पद नसतानाही, डुगिनचे वडील रशियन राष्ट्राध्यक्षांचे जवळचे सहकारी आहेत.

टॅग्स :Vladimir Putinव्लादिमीर पुतिनRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया