शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

"भारताला लुटलं तसंच आता रशियालाही लुटू पाहतायत..," पाश्चात्य देशांवर पुतीन यांचा जोरदार निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2022 06:14 IST

क्रेमलिन येथे आयोजित एका कार्यक्रमात रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी आपल्या देशात डोनेस्तक, लुहान्स्क, झापोरिझिया, खेरसन यांचा समावेश करण्यासाठी अधिकृत दस्तऐवजावर स्वाक्षरी केली. 

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी शुक्रवारी संध्याकाळी (भारतीय वेळेनुसार) युक्रेनच्या चार भागांना रशियाचा अधिकृत भाग म्हणून घोषित केले. क्रेमलिनमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी डोनेस्तक, लुहान्स्क, झापोरिझिया, खेरसन यांना रशियात समाविष्ट करण्यासाठी अधिकृत दस्तऐवजावर स्वाक्षरी केली. कार्यक्रमाला संबोधित करताना पुतीन यांनी पाश्चात्य देशांवर जोरदार निशाणा साधला.

यादरम्यान त्यांनी युक्रेनसोबत पुन्हा चर्चा करण्याबाबतही वक्तव्य केलं. मात्र, चर्चेदरम्यान ताब्यात घेतलेल्या भागांवर चर्चा होणार नाही, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले. दुसरीकडे युक्रेनने रशियाचा प्रस्ताव फेटाळून लावला असून पुतीन जोपर्यंत राष्ट्राध्यक्ष राहतील तोपर्यंत कोणतीही चर्चा होणार नसल्याचे म्हटले आहे. यादरम्यान पुतीन यांनी भारताचा उल्लेख करत भारताला लुटल्याप्रमाणे पाश्चिमात्य देशांना रशियाला त्यांची वसाहत बनवायचे असल्याचेही म्हटले.

पाश्चात्य देशांवर आरोपआपल्या भाषणादरम्यान पुतीन यांनी पाश्चात्य देशांवर रशियाला कमकुवत आणि विघटित केल्याचा आरोप केला. पाश्चिमात्य देशांनी मध्ययुगात आपली वसाहतवादी सत्ता सुरू केली. अमेरिकेतील लोकांची कत्तल, भारत आणि आफ्रिकेची लूट, चीनविरुद्ध युद्ध. पाश्चिमात्य देशांनी संपूर्ण देशाला अंमली पदार्थांवर अवलंबून ठेवत संपूर्ण समूहांची कत्तल केली. त्यांनी प्राण्यांप्रमाणे माणसांची शिकार केली. या सर्वांसाठीच पाश्चात्य देशांना रशियाला वसाहत बनवायचं आहे. आम्हाला अभिमान वाटतो की २० व्या शतकात आपल्या देशानं वसाहतविरोधी चळवळीचे नेतृत्व केलं, ज्यामुळे अनेक देशांना स्वातंत्र्य मिळाले," असं पुतीन म्हणाले. 

गॅस पाईपलाईनची तोडफोडपुतीन यांनी पाश्चिमात्य देशांवर जर्मनीतील रशियन गॅस पाइपलाइनची तोडफोड केल्याचा आरोप केला. पाश्चिमात्य देश रशियाला कमकुवत करण्याची नवीन संधी शोधत आहे. आपला देश इतका मोठा आहे हे सत्य ते पचवू शकत नसल्याचंही त्यांनी सांगितलं.डोनेस्तक, लुहान्स्क, झापोरिझिया, खेरसन येथील लोक आता रशियन नागरिक झाले असल्याचेही पुतीन म्हणाले. त्यांच्यावर हल्ला झाल्यास तो रशियावरील हल्ला मानला जाईल. रशिया आपल्या नागरिकांचे आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी सर्व शक्तीनिशी प्रतिकार करले असा इशाराही त्यांनी दिला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Vladimir Putinव्लादिमीर पुतिनrussiaरशियाRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया